ईद-ए-मिलाद म्हणजे काय ?
मिलाद म्हणजे जन्म.मिलाद-उन-नबी म्हणजे *इस्लाम धर्माचे संस्थापक मुहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस.*अरबी कॅलेंडरच्या तिसऱ्या महिन्याची(रबी-उल-अव्वल) १२ तारीख म्हणजे आजच्या दिवशी त्यांचा जन्म झाला.संपूर्ण जगाला इस्लामची शिकवण देणारे करुणामयी प्रेमळ अशा हजरत मुहंमद पैगंबर यांचा संपूर्ण जगात धुमधडाक्यात साजरा केला जातो.
याला सर्व ईदांची ईद असेही म्हटले जाते कारण रमजानच्या पवित्र महिन्यात कुराण अवतरले तर बकरी ईदला कुर्बानीचा सण म्हटले गेले पण या महिन्यात ज्यांच्यावर सर्वात अगोदर कुराण अवतरले,अशा मुहंमद पैगंबर यांचा जन्म झाला म्हणून या सणाला’इदोंकी ईद’ म्हणतात.
या दिवशी घर आणि गल्ली सजविली जाते.एकता आणि शांततेचा झंडा लावला जातो.जुलुस काढले जातात आणि मिठाई व शेरनी वाटली जाते.नात (इस्लामी पद्य ज्यात पैगंबर यांची स्तुती केली जाते) वाचली जाते व ऐकविली जाते.रात्री नमाज पठन केले जाते.
एकूणच आजचा दिवस हा संपूर्ण जगासाठी आनंदाचा दिवस आहे कारण अल्लाह ने पैगंबरांना धरतीवर पाठवून शांतता आणि एकता प्रस्थापीत केली व सर्वांना प्रेमाच्या दिशेने वाटचाल करावयास लावली.आजच्या अराजकतेच्या काळात आम्हांला महंमद पैगंबर यांचे अनमोल वचन परत एकदा कृतीत आणण्याची गरज आहे.अल्लाह आम्हांला मानवतेच्या प्रेमळ रस्त्यावर चालण्याची सद्बुद्धी देवो,हीच प्रार्थना……….आमीन !
*सर्वांना ईद-ए-मिलाद च्या हार्दिक शुभेच्छा !!!*