गुजरातच्या सुरत न्यायालयाने काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. त्यानंतर राहुल गांधी यांनी वकीलांमार्फत जामीन अर्ज केला आणि त्यांनी त्यांना जामीनही मिळाला. पण राहुल गांधींच्या यांच्या जामीन अर्जावर निर्णय येताच काँग्रेसमध्ये वेगळीच वातावरण निर्मिती झाली आहे.
न्यायालयाचा निकाल येताच काँग्रेस कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरुन आंदोलनाला सुरुवात केली, तर दुसरीकडे काँग्रेसने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटचा प्रोफाईल फोटो बदलल्याचे दिसत आहे.काँग्रेसने आपल्या ट्विटर, फेसबुक आणि इन्स्टाग्राम अकाऊंट यांसारख्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर राहुल गांधींचा नवा फोटो अपलोड केला आहे. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेतील हा फोटो असून त्यावर ‘डरो मत …’ असं लिहीलं आहे. त्यानंतर देशभरातील काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांनीही आपले प्रोफाईल फोटो बदलण्यास सुरुवात केली आहे.
सुरत न्यायालयाने राहुल गांधींना जामीन दिल्यानंतर राहुल सांयकाळी सुरतहून दिल्लीत पोहचले. पण ते दिल्लीत पोहोचण्यापूर्वीच त्यांच्या घरासमोर कार्यकर्ते आणि समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. सोनिया गांधीही राहुल यांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी पोहचल्या होत्या. राहुल गांधी यांनीही या निकालानंतर ट्वीट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ”भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना त्यांच्या पुण्यतिथी दिनी विनम्र अभिवादन! सत्य आणि धाडसाने देशासाठी निर्भयपणे लढणे हे भारतमातेच्या या शूर सुपुत्रांकडून आपण शिकलो आहोत. क्रांती चिराय़ू होवो.”असं ट्विट राहुल गांधींना केलं आहे
राहुल गांधींचा आवाज दाबण्यासाठी सरकारकडून साम, दाम, दंड, भेदाचा वापर सुरु असल्याची टिका काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी केली आहे. याच वेळी त्यांनी ट्विट कर केंद्रातील मोदी सरकारवरही निशाणा साधला आहे. ‘घाबरलेले केंद्र सरकार संपूर्ण यंत्रणा साम, दाम, दंड भेदाचा वापर करुन राहुल गांधींचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत केला. पण माझा भाऊ कधी घाबरला नाही आणि कधी घाबरणारही नाही. तो सत्य बोलत जगला, सत्य बोलतच राहणार. देशातील जनतेचा आवाज उठवत राहणार.सत्याची ताकद आणि कोट्यवधी देशवासीयांचे प्रेम त्याच्या पाठीशी आहे.” असं ट्विट प्रियांका गांधींनी केलं आहे.