• Wed. Apr 30th, 2025

काशीमधून मोदी आज निवडणुकीचं बिगुल वाजवणार ; भाजप मिशन २०२४

Byjantaadmin

Mar 24, 2023

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची तयारी सुरु आहे. गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा सक्रीय झालेले दिसत असताना आता थेट जनतेशी संवाद साधण्याचा प्रयत्न भाजपकडून होत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज (शुक्रवारी) वाराणसी येथे दौरा आहे. त्यांच्या दौऱ्याची आणि सभेची जोरदार तयारी भाजपने केली आहे. यानिमित्ताने आज भाजप लोकसभा २०२४ च्या निवडणुकीचे बिगुल वाजविणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन-चार महिन्यानंतर आपल्या वारणसी मतदार संघात येत असतात. ते आपल्या दौऱ्यात एक-दोन हजार कोटींच्या निधीची घोषणा नेहमी करताना दिसतात. आजच्या सभेमुळे वाराणसी परिसरात निवडणुकीचे वातावरण निर्माण झाल्याचे चित्र आहे.

सात ठिकाणी स्वागत

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज पोलिस लाइन येथे येणार आहेत. तेथून ते सिगरा येथील रुद्राक्ष सेंटर येथे जातील. या मार्गावर मंत्री, लोकप्रतिनिधी यांच्याकडून सात ठिकाणी त्यांचे स्वागत करण्यात येणार आहे. या मार्गावर सर्वत्र फुलांची सजावट करण्यात आली आहे.

मोदींचे आगमन होताच ढोल-नगारांच्या आवाजात त्यांचे स्वागत करण्यात येणार आहे. २०१४ मध्ये मोदींनी लोकसभा निवडणुकीचा अर्ज दाखल केला होता, तेव्हा मलदहिया ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत त्यांच्या स्वागतासाठी अशीच तयारी केली होती.

दुचाकीरॅलीचे आयोजन

मोदींच्या सभेपूर्वी भाजपच्या सर्व विभागाकडून दुचाकीरॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. यात मंत्री डाँ. दयाशंकर मिश्र दयालु हे सहभागी होणार आहेत. या रॅलीच्या दरम्यान कार्यकर्ते, पदाधिकारी हे मतदारांच्या घरी जावून त्यांना आमंत्रण देणार आहेत. हे सगळं निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरु असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

मंत्री, आमदार रॅलीत सहभागी नाहीत..

आपले खासदार, पंतप्रधान मोदी येणार असल्याने स्थानिक भाजप नेत्यांनी त्यांच्या स्वागतासाठी जोरदार तयारी केली आहे. भाजपचे क्षेत्रीय अध्यक्ष महेश चंद श्रीवास्तव यांनी सभेच्या तयारीचा आढावा घेतला आहे. मोदींच्या रॅलीमध्ये कुठलाही मंत्री, आमदार सहभागी होणार नाही. ते थेट सभास्थळावर उपस्थित राहणार असल्याचे भाजपकडून सांगण्यात आले.

वॉटर प्रुफ सभामंडप

कैंट ते गोदौलिया या ६४४.४९ कोटींचा खर्च करुन तयार करण्यात आलेल्या रोपवेच्या माँडेलचे मोदींच्या हस्ते उद्धघाटन होणार आहे. पावसाची शक्यता असल्याचे या ठिकाणी वॉटर प्रुफ सभामंडप उभारण्यात आला आहे. व्यासपीठासह अन्य सहा ठिकाणी मोठे स्क्रीन लावण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *