1️⃣ गडकिल्यारेच्या संवर्धनाच्या कामाला गती दयावी
2️⃣ नवीन सांस्कृतिक धोरणाची अमंलबजावणी करावी
3️⃣ महाराष्ट्र राज्याचे म्युझीयम स्थापन करावे
4️⃣ पु.ल.देशपांडे अकादमीचा विस्तार करून विभागनिहाय केंद्र स्थापन करावीत
5️⃣ बार्टी व सारथीच्या धर्तीवर अल्पससंख्याकासाठी स्वायत्त संस्था स्थापन करावी
6️⃣ ओबीसी वसतीगृह उभारणी कामाला गती दयावी
7️⃣ दिव्यागांचे आरक्षण व योजनांची काटेकोर अमंलबजावणी करावी
लातूर प्रतिनिधी : मुंबई नजीक अरबी समुद्रात उभारावयाच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकांसाठी अर्थसंकल्पात भरीव निधीची घोषणा करावी, कालबघ्द कार्यक्रम आखून हे स्मारक पूर्णत्वास न्यावे अशी आग्रही मागणी माजी मंत्र, आमदार अमित विलासराव देशमुख यांनी आज विधानसभेत केली.
महाराष्ट्र शासनाच्या सन २०२३-२४ अर्थसंकल्पातील पर्यटन व सांस्कृतिक, अल्पसंख्याक विकास, इतर मागसवर्गीय कल्याण व दिव्याग कल्याण विभागाच्या मागण्यावरील चर्चेत भाग घेतांना आज आमदार अमित देशमुख यांनी अभ्यासपूर्ण विस्तृत मांडणी करीत या विभागांच्या मागण्या लावून धरल्या. पर्यटन आणि सांस्कृतिक विभागासाठी अर्थसंकल्पात जी तरतूद केली आहे. ती अपूरी असल्याचे त्यांनी म्हटले. अमृतकाळातील या अर्थसंकल्पात पंचसुत्रीचा वापर केल्याचे सांगण्यात येत असले तरी मोठा इतिहास आणि उज्वल परंपरा असलेल्या महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पात पर्यटन आणि सांस्किृतक विभागासाठी भरीव निधी मिळणे आवश्यक असल्याचे आमदार देशमुख यांनी म्हटले आहे.
राज्याची राजधानी असलेल्या मुंबई शहरानजीक अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारले जावे ही संकल्पना आदरणीय विलासराव देशमुख यांनी मुख्यमंत्री असतांना चर्चेत आली. त्यानंतर सत्तेत आलेल्या युती व महायुती आणि आघाडीच्या सरकारामध्ये यावर चर्चा होत राहीली. या संदर्भात निर्णही झाले पण प्रत्यक्ष कामाला हवी तशी गती मिळाली नाही, ही वस्तुस्थिती आहे. सरकार कोणत्याही पक्षाचे असो त्या सरकारमध्ये सर्वच प्रतिनिधी आणि जनतेची भावना ही लवकरात लवकर स्मारक पूर्णत्वास जावे हीच आहे. त्यामूळे या विषयनिहाय चर्चेला उत्तर देतांना सबंधीत मंत्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकासाठी भरीव निधीची तदतूद करून कालबध्द कार्यक्रमाची घोषणा करतील अशी अपेक्षा आहे.
*गडकिल्याहीच्या संवर्धनासाठी*
*भरीव निधीची तरतूद करावी*
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाच्या उभारणी बरोबर राज्यातील गडकिल्यानिचे जतन आणि संवर्धन केले जावे ही सर्वांचीच इच्छा आणि मागणी आहे. महाविकास आघाडी सरकारने या संदर्भाने धोरणात्मक निर्णय घेतलेला आहे. हे काम आपणाला पूढे घेऊन जावे लागणार आहे. या कामासाठी शेकडो नव्हे हजारो कोटी लागणार आहेत. त्यासाठीचे नियोजन आणि कालबध्द अमंलबजावणी करणे आवश्यक आहे, असे आमदार अमित देशमुख यांनी म्हटले. रायगड किल्यावाचा विकास केंद्र आणि राज्य सरकार मिळून करणार आहेत. या प्रकल्पाला ही गती देणे गरजेचे आहे असे त्यांनीही म्हटले आहे.
*नवीन सांस्कृतिक धोरणाची*
*अमंलबजावणी करावी*
राज्याच्या सांस्कृतिक धोरणाचा आढावा घेऊन ते नव्याने मांडण्याचा निर्णयही मागच्या सरकारमध्ये सांस्कृतिक कार्यमंत्री म्हणून आम्ही घेतला होता. हे नवीन सांस्कृतिक धोरण अंतीम टप्याकृत आहे त्याच बरोबर, लोककला धोरण, चित्रपट व चित्रपटगृह धोरणही नव्याने तयार करण्याचे ठरले होते. चित्रपटाला उदयोगाचा दर्जा देण्या संदर्भात त्यात निर्णय घेण्यात आलेला आहे. या संदर्भाने सांस्कृतिक विभागाने अंतीम निर्णय घ्यावा, अशी मागणी करून राज्यातील कलाकारांच्या सर्व्हेक्षणाचे काम कोणत्याच टप्या ेत आहे, याची माहिती दयावी असेही त्यांनी म्हटले आहे.
*महाराष्ट्र राज्याचे म्युझीयम स्थापन करावे*
मोठा इतिहास आणि वैभवशाली परंपरा असलेल्या महाराष्ट्र राज्यात व्यापक म्युझीयम असावे अशी संकल्पाना पूढे आलेली असून त्यावर राज्याच्या सांस्कृतिक आणि पर्यटन विभागाने काम सुरू करून ती संकल्पना पूर्णत्वास न्यावी अशी सुचना आमदार देशमुख यांनी मांडली.
*पु.ल.देशपांडे अकादमीचा विस्तार करून*
*विभागनिहाय केंद्र स्थापन करावीत*
राज्याच्या सांस्कृतिक विभागाला दिशा देणाऱ्या पु.ल.देशपांडे अकादमीची इमारत जिर्ण अवस्थेत गेली आहे. त्या दुरूस्तीसाठी शासनाने तातडीने १० कोटी रूपयाची तरतूद करावी, अशी मागणी आमदार देशमुख यांनी केली. या अकादमीचा विस्तार करून राज्यातील पुणे, औरंगाबाद, अमरावती, नागपूर, नाशिक यासर्व विभागीय मुख्यालयाच्या ठिकाणी अकादमीची केंद्र स्थापन करावीत, अशी मागणीही त्यांनी केली.
*बार्टी व सारथीच्या धर्तीवर अल्पससंख्याकासाठी*
*डॉ.ए.पी.जे.अब्दूल कलाम स्वायत्त संस्था स्थापन करावी*
राज्याच्या अर्थसंकल्पात अल्पसंख्याक विभागाचा निधीमध्ये वृध्दी करण्यात आली नाही असे नमूद करून लोकसंख्येच्या प्रमाणात शक्य नसले तरी किमान या विभागाचे काम चांगले चालावे यासठी भरीव निधीची घोषणा करावी असे मागणी यावेळी त्यांनी केली. अल्पससंख्याक समाजातील शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक मागसलेपण लक्षात घेऊन बार्टी, सारथी, महाज्योतीच्या धर्तीवर डॉ.ए.पी.जे.अब्दूल कलाम संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था स्थापन करावी अशीही मागणी त्यांनी यावेळी केली. यातून फक्त मुस्लीमच नव्हे तर राज्यातील नवबोध्द, जैन, शिख, पारशी या समाजाचा विकास साधता येईल असे त्यांनी म्हटले आहे.
*ओबीसी वसतीगृह उभारणी*
*कामाला गती दयावी*
इमाव समाजातील विदयार्थ्यांसाठी वसतीगृह सुरू करण्याचा निर्णय झालेला आहे, मात्र या निर्णयाचीअमंलबजावणी गती मिळाली नाही. त्यामुळे निर्णय वेगावान सरकार गतीमान अशी घोषणा देणाऱ्या या सरकारने त्यांची घोषणा प्रत्यक्षात उतरवावी असेही आमदार देशमुख यांनी उपरोधीकपणे म्हटले आहे.
*दिव्यागांचे आरक्षण व योजनांची*
*काटेकोर अमंलबजावणी करावी*
दिव्यांगाच्या कल्याणासाठी आजवर अनेक निर्णय झाले त्यांच्या अमंलबजावणीचा तपशील उपलब्ध होत नाही. शासकीय नोकरीमध्ये दिव्यांगासाठी आरक्षण ठेवण्यात आले आहे त्यांची पररीपूर्ती किती टक्के झाली हे या विभागाने जाहीर करावे. त्याच बरोबर या विभागाच्या योजानांची काटेकोर अमंलबजावणी करावी अशी मागणी आमदार देशमुख यांनी बोलतांना शेवटी कंली.
——–