माजी सैनिक, अवलंबितांच्या स्पर्श पेन्शन विषयक अडीअडचणींचे होणार निराकरण
• राज्यात विविध ठिकाणी स्पर्श पथकाचा दौरा
लातूर, दि. 23 (जिमाका) : जिल्ह्यातील माजी सैनिक, अवलंबितांच्या स्पर्श पेन्शनविषयक अडीअडचणी सोडविण्यासाठी नवी दिल्ली येथील सीजीडीए यांच्या कार्यालयाद्वारे राज्यात विविध ठिकाणी स्पर्श पथकाचा दौरा आयोजित करण्यात आला आहे.
पुणे येथे 24 व 26 मार्च, सांगली येथे 24 व 26मार्च, सातारा येथे 27 व 29 मार्च, कोल्हापूर येथे 27 व 29 मार्च आणि रत्नगिरी येथे 27 व 29 मार्च रोजी स्पर्श पथकाचा दौरा आयोजित केला आहे. लातूर जिल्ह्यात या पथकाचा दौरा आयोजित करणे शक्य नसल्याने जिल्ह्यातील माजी सैनिक, अवलंबितांनी स्पर्श पेन्शनबद्दल काही अडचणी असल्यास नजीकच्या जिल्ह्यात जावून आपल्या अडचणींचे निराकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल (नि.) शरद पांढरे यांनी केले आहे.