भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पानगाव येथील चैत्यस्मारकास तिर्थस्थळाचा दर्जा जाहीर:माजी मंत्री, आमदार अमित देशमुख यांच्या पाठपूराव्याला यश
लातूर प्रतिनिधी : लातूर जिल्हयातील रेणापूर तालुक्यातील पानगाव येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चैत्यस्मारकास तिर्थस्थळाचा दर्जा देण्यासंदर्भात माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी केलेल्या मागणीला अनुकूल प्रतिसाद देत, राज्याचे पर्यटन, कौशल्य विकास मंत्री ना. मंगलप्रभा लोढा यांनी आज त्या संदर्भातील घोषणा विधानसभेत केली.
महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी महाराष्ट्रात मुंबई, नागपूर व रेणापूर तालुक्यातील पानगाव या ठिकाणी ठेवण्यात आल्या आहेत. मुंबई व नागपूर प्रमाणे रेणापूर तालुक्यातील पानगाव येथील चैत्यभुमी परिसरात दररोज हजारोंच्या संख्येने अस्थी दर्शनासाठी येत असतांत. त्यामुळे या परिसराला तिर्थ क्षेत्राचा दर्जा देऊन येथे विशेष सोयीसुवीधा उभाराव्यात, अशी मागणी राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी विदयमान राज्याचे पर्यटन, कौशल्य विकास मंत्री ना. मंगलप्रभा लोढा यांची भेट घेऊन केली होती. सदया चालू असलेल्या अधिवेशन काळात आमदार देशमुख यांनी ही मागणी लावून धरली होती. आज अर्थसंकल्पातील पर्यटन व सांस्कृतिक विभागाच्या मागण्यावरील चर्चेला उत्तर देतांना आमदार अमित देशमुख यांच्या पानगाव येथील चैत्यभूमी स्मारकास तिर्थ क्षेत्राचा दर्जा देण्यात येत असल्याची घोषणा केली.
सन २००९ ते २०१४ दरम्यान आघाडी सरकार असतांना आमदार अमित देशमुख यांना राज्यमंत्री म्हणून काम करण्याची अल्पकाळासाठी संधी मिळालेली असतांना त्यांनी पानगाव येथील चैत्यस्मारकास विशेष निधी मंजूर करून तेथे येणाऱ्या भावीकासाठी सोयीसुवीधा उभारल्या आहेत. या ठिकाणी राज्यभरातून हजारोंच्या संख्येने लोक भेट देत असतात त्यामुळे या स्मारकास विभागीय दर्जा मिळावा, हे ठिकाण बुदिष्ट पर्यटन स्थळ म्हणून विकसीत व्हावे, येथे बार्टीच्या वतीने प्रशिक्षण व संशोधन केंद्र उभारले जावे यासाठी आमदार देशमुख हे सातत्यांने प्रयत्नशील आहेत. आज त्यांच्या प्रयत्नाला यश येऊन हे स्थळ पर्यटन स्थळ झाले आहे. हा निर्णय जाहीर केल्या बददल आमदार देशमुख यांनी राज्याचे पर्यटन, कौशल्य विकास मंत्री ना. मंगलप्रभा लोढा यांचे आभार मानले आहेत. लातूर जिल्हा तसेच परिसरातील जनतेमधून या संदर्भाने आनंद व्यक्त करण्यात येत आहे.