लिंगायत समाजाच्या वतीने माझा सत्कार मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना समर्पित-आ. अभिमन्यू पवार
महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ निर्णयाचे स्वागत ;लिगायत समाजाच्या वतीने आ. अभिमन्यू पवारांचा सत्कार
औसा- अनेक वर्षांपासून लिगायत समाजाच्या वतीने महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाची मागणी होती. या मागणीसाठी मी माझ्या सह काही आमदारांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा केला आणि ५० कोटीच्या निधीसह या अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या महामंडळाची घोषणा केली हे सर्व श्रेय त्यांचे आहे. औसा तालुक्यातील लिंगायत समाजाच्या वतीने माझा होत असलेला हा सत्कार मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना समर्पित करीत असल्याचे आमदार अभिमन्यु पवार म्हणाले ते औसा येथे आयोजित लिगायत समाजाच्या वतीने महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाची घोषणा अर्थसंकल्पीय अधिवेशनात झाली होती. यासाठी आमदार अभिमन्यु पवार यांनी पाठपुरावा केला तसेच शासनाने निर्णय घेतला म्हणून (दि.१९) रोजी औसा येथे त्यांचा समाजाच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला होता. यावेळी तालुक्यातील व शहरातील असंख्य लिंगायत समाज बांधव उपस्थित होते…..
यावेळी पुढे बोलताना आमदार अभिमन्यु पवार म्हणाले की महात्मा बसवेश्वरांचे विचार व साहित्य जगाला दिशा देणारे आहे त्यामुळे त्यांचा विचार अधिक मजबूत व्हावा हीच सरकार व आमची भावना आहे येणाऱ्या काळात शहरात त्यांचा भव्य पुतळा उभा करण्याचा निर्णय मी घेतला आहे एवढेच नव्हेतर छत्रपती शिवाजी महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर व साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा ही बसवण्यात येणार आहे वरील महामानवाचा विचार कायम पुढील पिढीला प्रेरणादायी ठरणार आहे नेहमी लिंगायत समाज भाजपच्या पाठीशी आहे लिंगायत समाजातील गोरगरीब लोकांना महामंडळाच्या माध्यमातून आर्थिक व व्यवसाईक मदत होणार असल्याचे ही आमदार अभिमन्यू पवार म्हणाले.यावेळी सत्कार प्रसंगी वीरशैव लिंगायत समाजाचे अध्यक्ष सुभाषप्पा मुक्ता, कंटप्पा मुळे, विजुआप्पा मिटकरी, महादेवप्पा कोरके, मुक्तेश्वर वागदरे, सोमशेखर स्वामी, संतोष मुक्ता,सुभाष जाधव, सूनील उटगे,दादा कोपरे, त्रिंबक औटी, पटने, वैजनाथ सिंदुरे, पवण राचट्टे,अमर उपासे,रवी कोपरे,अमर रड्डे,केदार निगुडगे,अमित शेटे, शिवरूद्र मुर्गे,शिवानंद औटी,प्रणव नागराळे, नागेश मुरगे,रवी पटणे, नितीश तीलगुळे, संगमेश्वर उटगे, गिरीष ईळेकर, संजय सगरे, विठ्ठल बेडजवळगे , पंत बिराजदार,दादा विभुते,महेश बनसोडे,नितीन कवठाळे,बालाजी पाटील, बाबुराव बिराजदार,दत्तू वाडीकर, बब्रुवान बिराजदार,गणेश बिराजदार,दामू चिल्ले,बालाजी बिराजदार,नारायण विभुते ,व्यंकट जगताप,प्रकाश विभुते ,शरणाप्पा विभुते ,राजेंद्र ढगे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.प्रास्ताविक धनराज परसने यांनी केले..
…
आ. पवारांचा ध्यास व अभ्यास दांडगा… सुभाषअप्पा मुक्ता…
या सत्कार प्रसंगी बोलताना लिंगायत समाजाचे अध्यक्ष सुभाषअप्पा मुक्ता म्हणाले की स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्यांदा लिंगायत समाजासाठी सर्वात मोठा निर्णय या निर्णयामुळे समाजातील गोरगरीब तरुणांना मोठा फायदा होणार आहे आमदार अभिमन्यु पवार यांनी शासनाकडे या कामासाठी पाठपुरावा केला आणि मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी अर्थसंकल्पात याची घोषणा केली आमदार झाल्यापासून आमदार पवार हे मतदार संघातील विकासाला चालना देतच आहेत या वर विविध समाजातील प्रश्न लक्षात घेऊन सोडवणूक ही करीत आहेत त्यांच्यातील ध्यास व अभ्यास याला तोड नाही आगामी काळात तालुक्यातील सर्व लिंगायत समाज त्यांचा पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.