पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आडनावावरून टीका करणं राहुल गांधी यांना चांगलच महागात पडलं आहे. मोदी आडनावावरून अपमान केल्याप्रकरणी राहुल गांधींवर मानहानीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी आज न्यायालयाने राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. दरम्यान, न्यायालयाच्या या निर्णयानंतर विविध राजकीय राजकीय प्रतिक्रिया उमटत असून काँग्रेस नेते सचिन सावंत यांनीही या निर्णयावरून मोदी सरकारला लक्ष्य केलं आहे.
सचिन सावंतांचं मोदी सरकावर टीकास्र
एखाद्या राजकीय विधानावर दोन वर्षांची शिक्षा केवळ मोदींच्या न्यू इंडियात होऊ शकते, असे म्हणत सचिन सावंत यांनी ट्वीटद्वारे पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे. तसेच हाच नियम लागू केला तर पंतप्रधान मोदींसह भाजपाचे अनेक नेत्यांना जन्मठेप होईल, असेही ते म्हणाले.
*लक्षात ठेवा! आमच्याकडेही जोडे अन् तुमच्या नेत्यांचे फोटो आहेत, बाळासाहेब थोरात यांचे सत्ताधारी शिवसेना-भाजपला खडेबोल*
*https://jantaexpress.co.in/?p=5575*