Uddhav Thackeray – Fadnavis Meet: अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा सध्या शेवटचा आठवडा सुरु आहे. आज (गुरुवारी) सभागृहाचे कामकाज सुरु होण्यापूर्वी विधीमंडळाच्या आवारात ठाकरे गटाचे पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Devndra Fadnavis)आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Uddhva Thackeray) यांनी एकत्र प्रवेश केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.
फडणवीस-उद्धव ठाकरेंची झालेली एकत्र एन्ट्री माध्यमांच्या कॅमेऱ्यांनी टिपली. दोन्ही नेते संवाद साधत, स्मित हास्य करीत सभागृहात पोहचले. फडणवीस आणि ठाकरे हे उघडपणे चर्चा करताना दिसल्याने अनेकांना आश्चर्य व्यक्त केले आहे.
किती दिवसात नाही भेटलो एकमेकांस तिऱ्हाईत भासलो.. खोटेचं तरीही सराईत हासलो…” असेच वर्णन या भेटीचं करावं लागेल.
भाजप-शिवसेना पंचवीस वर्षांचा संसार मोडून वेगळे झालेले दोन नेते एकत्र येताना पाहुन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. युती तुटल्यानंतर नियमितपणे एकमेकांवर तुटून पडणारे उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी विधानभवन परिसरात एकत्र एन्ट्री घेतली. या दोघांच्या एकत्र येण्याने युतीचा नवा फॉर्म्युला तयार होणार का अशी चर्चाही दबक्या आवाजात सुरु झाल्या आहेत
राज्यात शिवसेनेत फुट पडल्यानंतर प्रथमच फडणवीस-ठाकरे एकत्र दिसले. हे दोन्ही नेते एकत्र आले का ? अशा चर्चा यावेळी रंगल्या. उद्धव ठाकरे यांच्यासोबत आदित्य ठाकरे, अंबादास दानवे आणि ठाकरे गटाचे इतर आमदार उपस्थित होते.
अधिवेशन संपता संपता दिसलेले चित्र
उपमुख्यमंत्री फडणवीस येत असताना उद्धव ठाकरे थांबले..दोघे एकत्र चालत विधी मंडळाच्या पायऱ्या चढले..
दोन जुने मित्र ' शिवसेना ' हातातून गेल्यावर एकत्र दिसले! #मैत्री #शत्रू #राजकारण pic.twitter.com/N1CR2RBSGn— Rashmi Puranik (@Marathi_Rash) March 23, 2023
यावर उद्धव ठाकरे म्हणाले, “पूर्वी खुलेपणा होता. आता बंद दाराआड चर्चा ही अधिक फलदायी होते असं म्हणतात. आता भविष्यात आमची बंद दाराआड चर्चा झाली तर तेव्हा बोलू. आम्ही दोघे एकत्र प्रवेशद्वारातून प्रवेश करताना रामराम, हाय हॅलो करतो तसं झालं,”