गुढी पाढव्याच्या शुभ मुहूर्तावर देशाचे गृहमंत्री अमित शाह यांची पाशा पटेल यांनी घेतली सदिच्छा भेट
कृषी मालाच्या पडलेल्या बाजारभावासंदर्भात सकारात्मक चर्चा
लातुर :-दिनांक 22 मार्च 2023 रोजी गुढी पाढव्याच्या शुभ मुहूर्तावर देशाचे गृहमंत्री अमित शाह यांची पाशा पटेल यांनी घेतली सदिच्छा भेट घेतली. या भेटी दरम्यान पाशा पटेल यांनी सोयाबीन, कापूस, मोहरी व अन्य शेतमालाच्या घसरलेल्या बाजारभावासंदर्भात सविस्तर माहिती दिली. राज्यातील शेतकऱ्यांनी बाजारभाव वाढीच्या आशेने आपला शेतमाल मागील दोन वर्षापासून घरात ठेवला असून, या संदर्भात राज्याचे उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र शासनाकडे पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला असून त्याचे पत्र या वेळी अमित शाह यांना देण्यात आले.
तसेच लोदगा जि. लातूर येथे राज्याच्या अर्थसंकल्पात मंजुर करण्यात आलेल्या बांबू क्लस्टर ची निर्मिती केल्याबद्दल केंद्र व राज्य शासनाचे आभार मानले. बांबू पासून बेंगलुरू येथील तयार करण्यात आलेल्या नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धर्तीवर मुंबई येथे राज्य शासनाच्या माध्यमातून MMRDA च्या वतीने दोन मेट्रो स्थानक बांबू पासून तयार होत असलेबाबत ची माहिती दिली. व फिनिक्स फाउंडेशन लातूर मार्फत सुरु होणाऱ्या नवीन कृषी महाविद्यालय बाबत सविस्तर चर्चा या भेटीदरम्यान झाल्याचे श्री. पटेल यांनी सांगितले.
कृषी मालाच्या पडलेल्या बाजारभावासंदर्भात शासन दरबारी सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन अमित शाह यांनी दिले. या भेटीदरम्यान फिनिक्स फाउंडेशन चे समन्वयक परवेज पटेल उपस्थित होते.