लातूर :– गुढीपाडवा सणाचे औचित्य साधून ज्येष्ठ लेखक तथा “आतला आवाज” मासिकाचे संपादक श्री जयप्रकाश दगडे,प्रा.स्मिता दगडे,प्रतिक दगडे यांनी “रीड लातूर” उपक्रमास पुस्तके भेट देऊन वाचनसंस्कृती जापासण्याच्या चळवळीत सहभाग नोंदवला.
सौ.दीपशिखा धिरज देशमुख यांच्या संकल्पनेतून व आमदार धिरज विलासराव देशमुख यांच्या पुढाकाराने वाचन संस्कृती जोपासली जावी यासाठी “रीड लातूर ” उपक्रमाची सुरूवात करण्यात आली. या उपक्रमास समाजातील विविध स्तरातील व्यक्तीं कडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असून या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे सर्वांनी स्वागत केले आहे.
याचाच एक भाग म्हणून श्री जयप्रकाश दगडे व त्यांच्या परिवाराकडून “रीड लातूर” उपक्रमास पुस्तके देवून या उपक्रमास हातभार लावला आहे.
यावेळी “रीड लातूर” टीमचे सदस्य श्री.रावसाहेब भामरे, श्री.शिवलिंग नागापुरे ,श्री.केशव गंभीरे,श्री.उमेश खोसे , श्री.विजय माळाळे,श्री.सुरेश सुडे,श्री.विजयकुमार कोळी व “रीड लातूर”उपक्रमाचे समन्वयक राजू सी पाटील आदींची उपस्थिती होती.