• Thu. Aug 14th, 2025

त्रपती संभाजीनगर येथे होणाऱ्या महाविकास आघाडीच्या ऐतिहासिक सभेत सामील व्हा-माजी खासदार चंद्रकांत खैरे

Byjantaadmin

Mar 21, 2023

छत्रपती संभाजीनगर येथे होणाऱ्या महाविकास आघाडीच्या ऐतिहासिक सभेत सामील व्हा शिवसेना नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांची साद

लातुर:-दिनांक 20 मार्च 2023  रोजी शिवसेना नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे हे लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असून लातूर जिल्ह्यातील शिवसेनेचे सर्व पदाधिकारी शिवसेनेच्या अंगीकृत सर्व संघटनेचे पदाधिकारी काँग्रेस राष्ट्रवादी शेकाप या मित्र पक्षासह झालेली महाविकास आघाडी या महाविकास आघाडीचे प्रमुख पदाधिकारी यांचे महत्त्वपूर्ण बैठक सन्माननीय खैरे  यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली असून ही बैठक 2 एप्रिल 2023 रोजी छत्रपती संभाजी नगर येथे शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे  यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये महाविकास आघाडीची मराठवाडा विभागीय प्रचंड सभा होणार असून या सभेला महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांनी पदाधिकाऱ्यांनी उपस्थित रहावे असे आव्हान माजी खासदार चंद्रकांत खैरे  यांनी केले. देशात सध्या एक प्रकारची अघोषित आणीबाणी असून लोकशाही संकटात आहे. सार्वभौमत्वाला धक्का लागलेला असून सत्तेचा गैरवापर करून प्रादेशिक पक्ष संपवून विरोधकावर खोटे गुन्हे दाखल करून सर्व विरोधकांना अडचणीत आणण्याचे काम या देशातलं केंद्र सरकार या राज्यातलं अनैतिक सरकार करीत असून या अन्यायाच्या विरोधात राज्यघटना वाचवायचा असेल लोकशाही वाचवायचे असेल सर्वसामान्य माणसाचे अधिकार अबाधित ठेवायचे असतील तर म्हणून महाविकास आघाडी स्थापन झालेली आहे. या महाविकास आघाडीच्या सभा मराठवाडा कोकण पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मुंबई या सर्व ठिकाणी होणार असून छत्रपती संभाजीनगर येथे होणारे मराठवाड्याच्या जाहीर सभेचे यजमान शिवसेनेकडे असल्यामुळे मी मराठवाड्यातला संपूर्ण जिल्ह्यामध्ये जाऊन शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी मित्रपक्ष आघाडीच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांना सूचना करीत असून माझा मराठवाड्याचा संपूर्ण दौरा मी घेत आहे. यामध्ये आज लातूर जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली असून भविष्यात महाविकास आघाडी एकसंघपणे राहण्यासाठी लातूर जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी जिल्ह्यापासून ते गावापर्यंत महाविकास आघाडीच्या बैठका घेऊन समन्वय साधावा आणि महाविकास आघाडी मजबूत करावी असा आव्हान करीत आहे. असेही खासदार खैरे म्हणाले महाराष्ट्रात निश्चित सत्ता परिवर्तन होणार असून महाविकास आघाडीची सत्ता या महाराष्ट्रात शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली येणारच यासाठी राज्यातील महाविकास आघाडीचे सर्व नेते पदाधिकारी अहोरात्र झटत असून लातूर जिल्ह्यातून सुद्धा लोकसभेचा खासदार तसेच सहाच्या सहा आमदार महाविकास आघाडीचेच येतील असाही विश्वास यावेळी खैरे  यांनी व्यक्त केला यावेळी शिवसेना उपनेत्या आदरणीय सुषमाताई अंधारे यांचेही मार्गदर्शन यावेळी झालं डोक्यावर पडलेली काही लोक अशोभनीय असं वर्तन करून बेताल वक्तव्य करत सुटलेले आहेत परंतु हे आऊट घटकाचे सत्ताधारी असून यांची सत्ता निश्चित जाणार आहे. सत्ता वाचवण्यासाठी नवनवीन प्रयोग करत आहेत. हे सगळे प्रयोग फसवे असून या महाराष्ट्रामध्ये शिवसेनेची ताकद जोमाने वाढत आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मी महाप्रबोधन यात्रेच्या निमित्ताने फिरत असून लोकांचा मिळत असलेला प्रतिसाद पाहता काही षड्यंत्र रचून सत्तेचा दुरुपयोग करून आमच्यातील 40 गद्दार जरी गेले असले या महाराष्ट्रात निश्चितच शिवसेना शंभरीचा आकडा पार करेल हा आत्मविश्वास मला वाटतो शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे  यांच्या बद्दलची सहानुभूतीची लाट आहे. ही लाटच आत्ताच्या सत्ताधाऱ्यांना वागून आंदोलन अशा झालेल्या या सरकारला ही सहानुभूतीची लाट त्यांची जागा त्यांना दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही असे सुषमाताई अंधारे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं त्यावेळी शिवसेनेचे विभागीय सचिव अशोकराव पटवर्धन साहेब शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजी माने बालाजी रेड्डी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजी माने यांनी सन्माननीय खासदार चंद्रकांत खैरे विभागीय सचिव अशोकराव पटवर्धन यांना सांगितले, की लातूर जिल्ह्यातून हजारो शिवसैनिक मराठवाड्याच्या छत्रपती संभाजीनगर येथे होणाऱ्या प्रचंड अशा जाहीर सभेस उपस्थित राहतील अशी नियोजन आम्ही करू व आपल्या आदेशाप्रमाणे माननीय पक्षप्रमुख यांच्या आदेशाप्रमाणे लातूर जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांसह प्रत्येक तालुका प्रत्येक जिल्हा परिषद प्रत्येक पंचायत समिती आणि प्रत्येक गावामध्ये महाविकास आघाडी मजबूत करण्यासाठी आम्ही सर्वजण मिळून प्रयत्न करू असे जिल्हाप्रमुख शिवाजी माने यांनी सांगितले. या बैठकीसाठी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय किरण जाधव साहेब राष्ट्रवादीचे सन्माननीय प्रशांत पाटील काँग्रेस राष्ट्रवादीचे प्रमुख पदाधिकारी लातूर जिल्ह्यातील सर्व उपजिल्हाप्रमुख सर्व तालुकाप्रमुख विविध संघटनेचे सर्व पदाधिकारी महिला आघाडी सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *