राज्यात ४० लोकांनी गद्दारी केली असली, तरी हे सरकार औटघटकेचे आहे. या सरकारविरोधात राज्यातील जनतेमध्ये मोठा रोष आहे. महाप्रबोधन यात्रेच्या निमित्ताने तो मी अनुभवला आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे शंभर आमदार निवडून येतील, असा विश्वास शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी व्यक्त केला.
MVA संयुक्त सभेनिमित्त घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत लातूर येथे त्या बोलत होत्या. सुषमा अंधारे म्हणाल्या, डोक्यावर पडलेली काही लोक अशोभनीय असं वर्तन करून बेताल वक्तव्य करत सुटलेले आहेत. SHIVSENA परंतु हे औट घटकेचे सत्ताधारी असून यांची सत्ता निश्चित जाणार आहे. सत्ता वाचवण्यासाठी नवनवीन प्रयोग केले जात आहेत, पण हे सगळे प्रयोग फसवे असून या महाराष्ट्रामध्ये शिवसेनेची ताकद जोमाने वाढत आहे.
संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मी महाप्रबोधन यात्रेच्या निमित्ताने फिरत असून लोकांचा मिळत असलेला प्रतिसाद पाहता सत्ताधारी हादरले आहेत. काही महिन्यांपुर्वी षड्यंत्र रचून सत्तेचा दुरुपयोग करत आमच्यातील ४० गद्दार जरी गेले असले, तरी या महाराष्ट्रात पुन्हा महाविकास आघाडीचीच सत्ता येणार हे निश्चित आहे.
येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना शंभरीचा आकडा पार करेल, हा आत्मविश्वास मला वाटतो. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल मोठी सहानुभूतीची लाट आहे. ही लाटच आत्ताच्या सत्ताधाऱ्यांना त्यांची जागा त्यांना दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही, असा दावा देखील अंधारे यांनी केला.