• Thu. Aug 14th, 2025

महाराष्ट्रात विधानसभा आणि लोकसभा निवडणुका एकत्रित? केंद्रीय नेतृत्वाकडे महाराष्ट्र भाजपचा प्रस्ताव

Byjantaadmin

Mar 21, 2023
New Delhi: Prime Minister Narendra Modi during Central Election Committee meeting at BJP HQ in New Delhi, Tuesday, March 10, 2020. BJP National President JP Nadda is also seen. (PTI Photo/Manvender Vashist)(PTI10-03-2020_000135B)

पुढील वर्षी देशभरात लोकसभा निवडणुका होणार आहेत. त्यासोबतच राज्यातील विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे. दोन्ही निवडणुका एकत्रितपणे घेण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र भाजपने केंद्रीय नेतृत्वाकडे पाठवला आहे. राज्यातील विरोधी पक्षातील नेत्यांनी या आधीच असाच अंदाज वर्तवला होता. अजित पवार, संजय राऊत, नाना पटोले यांनी राज्यात सत्तांतर झाल्यानंतर लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र होऊ शकतात, असा अंदाज वर्तवला होता.

महाराष्ट्रातील विधानसभा आणि लोकसभा निवडणुका एकत्र घेण्याचा प्रस्ताव भारतीय जनता पक्षाच्या राज्य कार्यकारिणीने राष्ट्रीय नेतृत्वाकडे पाठवला आहे. याबाबतचे वृत्त दैनिक ‘द हिंदू’ या वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झाले आहे. याआधी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही महाराष्ट्रात एकत्र निवडणुका होऊ शकतात, असे सांगितले होते. भाजपातील घडामोडीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी आम्ही केव्हाही निवडणुका घेण्यास तयार असल्याचं सांगितले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिष्मा आणि राष्ट्रीय मुद्द्याच्या जोरावर आपल्याला परिस्थिती अनुकूल होईल असे प्रदेश भाजपाला वाटत आहे. त्यामुळेच तसा प्रस्ताव केंद्रीय नेतृत्वाकडे पाठवण्यात आला असल्याची माहिती आहे.

भाजपचे केंद्रीय नेतृत्व पुढील वर्षी एप्रिल-मे या महिन्यामध्ये लोकसभा निवडणुकासोबतच विधानसभा निवडणुका घेण्याचा विचार करत आहे. तसा प्रस्ताव प्रदेश भाजपने दिल्याचे वृत्त ‘द हिंदू’ने दिले आहे. विधानसभा निवडणुकीच्या वेळी सार्वत्रिक निवडणुका झाल्या तर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा प्रभाव आणि राष्ट्रीय मुद्द्यांचाही मतदारांवर प्रभाव पडेल. शिवसेना पक्षातील फुटीमुळे राज्य भाजपने एकत्रित निवडणुकांचा प्रस्ताव ठेवला आहे. काँग्रेस, उद्धव ठाकरे यांचा गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसला विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीसाठी जागा वाटप करावे लागणार आहे. त्यातून त्यांच्यामध्ये मतभेद होऊ शकतात. जागा वाटप झाल्यावर राहुल कलाटेंसारखे अनेक बंडखोर तयार होतील.  त्याचा फायदा भाजप-शिवसेना शिंदे गटाला होऊ शकतो. एकनाथ शिंदे यांची शिवसेनेशी युती झाल्यानंतर त्याचा मतदारांवर चांगला परिणाम व्हायला वेळ लागणार आहे.  त्यामुळेच मोदी लाटेचा लाभ घेण्याचा भाजपाचा प्रयत्न असेल.

लोकसभा निवडणुकीनंतर राज्याच्या निवडणुका पाच-सहा महिन्यांनी होतात. त्यामुळे एकत्रित निवडणुकांचा मुद्दा फारसा महत्त्वाचा नसावा. प्रश्न हा आहे की…महाराष्ट्रातीला मतदार….मुंबईतला मराठी माणूस शिंदे-भाजपावर नाराज असेल… तर एकत्रीत निवडणुकांची जोखीम नरेंद्र मोदी घेणार का? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुध्दा विधानसभेसोबत एकत्र होणार का?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *