• Thu. Aug 14th, 2025

समृद्धीचा १०० दिवसांचा रिपोर्ट, महामार्गावर ९०० अपघात अन् ३१ बळी…

Byjantaadmin

Mar 21, 2023

नागपूर: विदर्भासोबतच राज्यात समृद्धी आणण्यासाठी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग बांधण्यात आला. मात्र हा महामार्गने समृद्धी येण्याऐवजी अपघातांचा महामार्ग बनत चालला आहे. महामार्ग खुला होऊन १०० दिवस झाले असून, त्यादरम्यान ९०० अपघातांची नोंद झाली असून, त्यात ३१ जणांचा मृत्यू झाला आहे.

samruddhi mahamarg accident

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ११ डिसेंबर २०२२ रोजी नागपूर ते शिर्डी समृद्धी महामार्गाचे उद्घाटन केले होते. जो समृद्धी महामार्गचा पहिला टप्पा होता. या महामार्गाला आज १०० दिवस पूर्ण झाले आहेत. यादरम्यान महामार्गावर ९०० छोटे-मोठे अपघात झाले. धक्कादायक म्हणजे ४६ टक्के अपघात हे तांत्रिक कारणांमुळे झाल्याचे समोर आले आहे. १५ टक्के अपघात टायर पंक्चरमुळे झाले आहेत. १२ टक्के अपघात हे टायर फुटल्यामुळे झाले आहेत.

या अपघातांमध्ये सर्वसामान्य नागरिकांना जीव गमवावा लागला, तर वन्य प्राणीही जखमी झाले. वाहनांच्या धडकेने बहुतांश वन्य प्राण्यांनाही जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे या महामार्गावर वन्य प्राण्यांच्या हालचालीबाबत निर्णय घेण्याची गरज आहे.
पंतप्रधान मोदींनी समृद्धी महामार्गाचे उद्घाटन केल्यानंतर हा रस्ताही वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. मात्र, वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे हा महामार्ग चर्चेत आला आहे. इंधन संपल्याने वाहने रस्त्यावर उभी केल्याने किंवा इंधन संपल्याने त्यांनी वाहन बाजूला पार्क केल्याने हा अपघात झाल्याचे परिवहन विभागाच्या तपासात समोर आले आहे. यासोबतच समितीने राज्य परिवहन विभागाला याबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्याचे आदेश दिले आहेत.

दुचाकीमुळे अपघात होण्याची शक्यता

समृद्धी महामार्गावर दुचाकी वाहनांना परवानगी नाही. मोठ्या वाहनांचा वेग जास्त असल्याने या मार्गावर दुचाकी वाहनांना बंदी आहे. मात्र, असे असतानाही अनेक ठिकाणी दुचाकीस्वार या महामार्गावरून प्रवास करताना दिसतात. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. दुचाकी अचानक समोर आल्याने वेगावर नियंत्रण ठेवणे कठीण जात असल्याच्याही तक्रारी आहेत

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *