• Thu. Aug 14th, 2025

थकबाकीदारांच्या दुकानांना सील ; नळपट्टी थकवणाऱ्यांच्या जोडण्या तोडल्या मनपाची कारवाई

Byjantaadmin

Mar 20, 2023

थकबाकीदारांच्या दुकानांना सील ; नळपट्टी थकवणाऱ्यांच्या जोडण्या तोडल्या मनपाची कारवाई

    लातूर/ प्रतिनिधी:मालमत्ता कर व नळपट्टी न भरणाऱ्यांच्या विरोधात लातूर शहर महानगरपालिकेने कारवाईची मोहीम हाती घेतली आहे.या अंतर्गत सोमवारी (दि.२० मार्च )मालमत्ता कर थकवणाऱ्यांच्या दुकानास सील करण्यात आले तर थकलेली नळपट्टी न भरणाऱ्यांच्या नळ जोडण्या खंडित करण्यात आल्या. मार्च अखेरीस आपल्याकडील थकबाकी व चालू बाकी भरावी,असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.शहरातील नागरिक त्यास प्रतिसाद देत चालू व थकबाकी भरणा करत आहेत. परंतु थकबाकीची रक्कम अधिक असूनही काही नागरिक आणि व्यावसायिकांकडून सहकार्य केले जात नाही.यामुळे मनपाच्या मनपाकडून ही कारवाई करण्यात येत आहे. सोमवारी झोन डी च्या विशेष वसुली पथकाने नळपट्टी न भरणाऱ्या नागरिकांच्या नळ जोडण्या खंडित केल्या.क्षेत्रीय अधिकारी बंडू किसवे,कर निरीक्षक तहेमीद शेख,स्वच्छता निरीक्षक अक्रम शेख, देवेंद्र कांबळे,राज मुबिन,महेश शर्मा, वैभव स्वामी,लिपिक गोविंद रोंगे, किशोर भालेराव,संगमेश्वर बिरादार व बेलकुंडे यांच्या पथकाने ही कारवाई केली. ज्यांच्या नळ जोडण्या खंडित करण्यात आल्या त्यांच्याकडे अनुक्रमे १ लाख ३८ हजार २४१ रुपये व १ लाख १६ हजार ४९५ रुपये थकबाकी होती.झोन डी मध्येच मालमत्ता कर न भरल्यामुळे पथकाने थकबाकीदाराचे दुकान सील केले. शहरातील नागरिक आणि व्यावसायिकांनी आपल्याकडे असणारी थकबाकी आणि चालू बाकीचा भरणा मनपाकडे करावा. वसुलीसाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांकडे किंवा मनपा मुख्यालयात कर भरणा करून सहकार्य करावे,अन्यथा पालिकेकडून कारवाई केली जाईल,असा इशारा देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *