• Thu. Aug 14th, 2025

माजी मंत्री दिलीपराव देशमुख  यांच्या हस्ते ९,५१,००० व्या साखर पोत्याचे पूजन संपन्न

Byjantaadmin

Mar 20, 2023

माजी मंत्री सहकार महर्षी मा. श्री. दिलीपराव देशमुख  यांच्या हस्ते ९,५१,००० व्या साखर पोत्याचे पूजन संपन्न

विलासनगर शेतकरी सभासदांच्या जिवनातील आर्थीक उन्नतीसाठी सातत्याने कार्यरत असलेल्या विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना लि. विलासनगर ता.जि. लातूर च्या चालू गळीत हंगाम २०२२-२३ मधील उत्पादित ९,५१,००० (५० कि.) व्या साखर पोत्याचे पूजन माजी मंत्री तथा मांजरा परिवाराचे मार्गदर्शक चेअरमन सहकार महर्षी दिलीपराव देशमुख  यांच्या शुभ हस्ते आज दिनांक २०.०३.२०२३ रोजी पार पडले.
याप्रसंगी कारखान्याचे व्हा. चेअरमन श्रीशैल उटगे,संत शिरोमणी साखर कारखान्याचे व्हा चेअरमन शाम भोसले, रेणाचे संचालक संभाजी रेड्डी, संभाजी सुळ,सचिन दाताळ,सतिश पाटील, कारखान्याचे संचालक सर्वश्री अशोकराव काळे, तात्यासाहेब देशमुख, वसंतराव उफाडे, बंकटराव कदम, सदाशिवराव कदम, अनिल दरकसे, धनराज दाताळ, बाबुराव जाधव, सचिन शिंदे, निळकंठ बचाटे (पवार), सुर्यकांत पाटील, शंकरराव बोळंगे, ज्ञानेश्वर पवार, कैलास पाटील, नवनाथराव काळे, शेरखॉ पठाण, ज्ञानेश्वर भिसे, महेंद्रनाथ भादेकर, कार्यलक्षी संचालक श्रीनिवास देशमुख, विलास चामले, विशाल पाटील, कार्यकारी संचालक श्री. जितेंद्र रणवरे, खाते प्रमुख अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चालू गळीत हंगाम मा. श्री. दिलीपरावजी देशमुख साहेब, माजी मंत्री मा.आ. अमित विलासरावजी देशमुख साहेब, मा. आ. धिरज विलासरावजी देशमुख साहेब यांच्या नेतृत्वात व सहकार्याने नियोजनबध्द पध्दतीने संचालक मंडळ व प्रशासनाने तत्परतेने कार्यक्षमतेपेक्षा अधिकचा वापर करून दैनंदिन गाळपास गती दिली. मांजरा साखर कारखान्याने आजपर्यंतचे सर्व गळीत हंगाम यशस्वी करून शेतकरी सभासदांच्या कष्टाचे मोल करत त्यांच्या जिवनात आर्थीक परिवर्तन घडवून आणले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *