अवकाळी, वादळी, गारपीट, पाऊसामुळे नुकसान झालेल्या ऊसाची विलास सहकारी साखर कारखाना लि.,च्या ऊसविकास विभागाने केली पाहणी ऊसाच्या नियोजना संदर्भात ऊसउत्पादकांना केल्या महत्वाच्या सुचना
वैशाली नगर, निवळी : विलास सहकारी साखर कारखाना ली. वैशालीनगर, निवळी कार्यक्षेत्रात मागील दोन ते तिन दिवसापासुन ब-याच ठिकाणी वादळ, वारा, पाऊस तसेच गारपीट झालेली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी सर्वच पिकांचे कमी अधिक प्रमाणात नुकसान झालेले आहे व होत आहे. विलास सहकारी साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातमध्ये ब-याच ठिकाणी वादळी वा-यासह गारपीट होऊन पुर्व हंगामी ऊसाचे तसेच अगोदर तुटलेल्या ऊसाचे मोठया प्रमाणात नुकसान झालेले आहे. ही बाब शेती व ऊसविकास विभागाच्या पाहणी दरम्यान लक्षात आली आहे.राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख व चेअरमन वैशाली विलासराव देशमुख यांनी या आपत्तीमध्ये ऊसाचे नुकसान होत आहे. शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी कारखान्याच्या वतीने ऊसाची पाहणी करून विविध उपाययोजना सुचविण्यात याव्यात असे आदेश कारखाना प्रशासनाला दिले आहेत. या अनुषंगाने व्हा.चेअरमन रविंद्र काळे, संचालक मंडळ व शेतकी आणि ऊसविकास विभागाने कार्यक्षेत्रातील उसाची पाहणी करून, त्या बाबतचे कारखाना कार्यक्षेत्रातील पुर्व हंगामी लागवड ऊसाचे, तसेच अगोदर तुटलेल्या खोडव्यांचे पाहणी केली, निरीक्षण नोंदवली आणि उपाय योजना खालील प्रमाणे सुचविल्या आहेत. · पाहणीनुसार कारखाना कार्यक्षेत्रातील वेगवेगळया विभागात साधारणपणे अर्धा ते एक तासभर मोठया वादळाबरोबर गारपीटही झाली आहे.· त्यामुळे शेतामध्ये व रस्त्यावर गारांचा थर साचलेला होता. गाराच्या तडाख्यामुळे ऊसपिकांची पाने पुर्णपणे छाटली गेली व ऊसाच्या पानाची मध्यशिरच शिल्लक राहीली. त्यामुळे शेतामध्ये ऊस पाने विरहीत उभे असल्याचे दिसुन आले.
· ऊसाच्या वाढयावर मार लागल्यामुळे ऊसाचे पोंगे आतील बाजूने कुजलेल्या अवस्थेत आढळल· हंगामानुसार ऊसपिकांचे नुकसान मोठया प्रमाणात झाल्याचे दिसुन आले.· लहान ऊस (पुर्व हंगाम लागवड सुरु हंगाम) व आगोदर तुटलेला खोडवासुध्दा गारपीटीच्या तडाख्यात सापडल्यामुळे अशा पिकांचे देखील मोठे नुकसानझाल्याचे निदर्शनास आले.· लहान ऊसाची पाने शिल्लक राहीली नाहीत ऊसांना कांडया आलेल्या नसल्यामुळे फक्त ऊसाचे पोंगे जिवंत असल्याचे दिसुन आले.· परंतु मोठया प्रमाणावर ऊसपिकाची हानी झाल्याने ऊसाच्या वाढीव मोठा परिणाम होणार आहे.यासर्व ऊस नुकसानीची शेतकी विभाग व ऊसविभागाने पाहणी करून शेतकऱ्यांना नकसान टाळण्यासाठी विविध उपाययोजना सुचविल्या आहेत. असे करा उपाय योजना- ऊस पिकांचे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी खालील प्रमाणे व्यवस्थापन करावे लागेल. · नवीन लागवड (पुर्व हंगाम व सुरु) तसेच खोडवा पिकांचे नुकसान जरी झाले असले तरी पिकांची कापणी करु नये. व त्यावर बुरशीनाशकाची (1 ग्राम कार्बेडेझिमकिंवा 1 ग्राम कॉपर ऑक्सीकलेराईड 1 लिटर पाण्यातुन स्टिकरसह) फवारणी करावी· लगेच नुकसानग्रस्त ऊसास एकरी एक बँग निमकोटेड युरियाची मात्रा दयावी.· द्रवरुप मुख्य, आणि सुक्ष्म अन्नद्रव्याची फवारणी करावी(कारखान्याकडे मुख्य व सुक्ष्म अन्नद्रव्ये उपलब्ध आहेत त्याचा वापर करावा) पुढील कालावधीत तापमानात होणारी वाढ लक्षात घेता या ऊस पिकांत खोडकिडीचे प्रमाण वाढणार आहे. खोड किडीचे प्रमाणात वाढण्याचा धोका लक्षात घेता खोडकिडीचे नियंत्रण करण्यासाठी एकरी 10 किलोफिप्रोनील 0.3 टक्के (रिजेंट ) किंवा 6 किलोकारटॅप हायड्रोक्लोराईड 0.4 टक्के ( केल्डान) वापरावे वरील प्रमाणे उपाय त्वरीत करावेत व अधिक माहितीसाठी नजिकच्या शेतकी कार्यालयाशी किंवा कारखाना मुख्य शेतकी कार्यालयाशी किंवा ऊसविकास अधिकारी जहागीरदार यांना मोंबाईल क्रमांकावर 94041 34714 संपर्क साधावा, असे आवाहन शेतकी व ऊसविकास विभाग विलास सहकारी साखर कारखाना वतीने करण्यात आले आहे..