• Thu. Aug 14th, 2025

अवकाळी व गारपिटीने नुकसान झालेल्या शेती पिकांचे तातडीने पंचनामे करा व तात्काळ शेतकऱ्यांना मदतीचा दिलासा द्या-जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने

Byjantaadmin

Mar 20, 2023
अवकाळी व गारपिटीने नुकसान झालेल्या शेती पिकांचे तातडीने पंचनामे करा व तात्काळ शेतकऱ्यांना मदतीचा दिलासा द्या-जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने
 निलंगा /प्रतिनिधी  दिनांक 17 व 18 मार्च 2023 रोजी लातूर जिल्ह्याला अवकाळी पावसाने व गारपिटीने झोडपून काढले  असून यामुळे झालेल्या शेती पिकाचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई देण्यात यावी असे नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करत असताना लातूर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने यांनी व्यक्त केले . गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली गारपीट व अवकाळी पाऊस यामुळे लातूर जिल्ह्यातील औसा, निलंगा, देवणी, शिरूर आनंतपाळ ,लातूर संपूर्ण जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झालेले असून ,एकीकडे शासनाची उदासीनता तर दुसरीकडे लहरी निसर्गामुळे शेतकरी प्रचंड नैराशीच्या गर्दीत अडकलेला आहे .दोन दिवसापासून शेतकऱ्यावर नैसर्गिक संकट आलेल आहे. शेतकऱ्याचे उभ पिक संपूर्णपणे आडव झालेल असून ,ज्वारी ,हरभरा, गहू ,द्राक्ष बाग, इतर फळबाग पूर्णपणे नष्ट झालेल आहे .त्यामुळे शेतकऱ्यांनी वर्षभर काबाडकष्ट करून आपल्या जवळची तुटपुंजी रक्कम शेतात घातलेली असून कुठेतरी दोन सुखाचे घास मिळण्याची वेळ आली असता,  अवकाळी पाऊस व गारपीट झाल्यामुळे लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान झालेले असून सदरील शेतकऱ्यांना शासनाकडून नुकसान भरपाई आर्थिक स्वरूपात मिळाल्याशिवाय शेतकरी जगू शकणार नाही .आज दिनांक 19 मार्च 2023 रोजी शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजी माने साहेब यांनी लातूर जिल्ह्यातील गारपीटग्रस्त नुकसानग्रस्त भागाला शेतकऱ्यांना भेट देऊन प्रशासनाला तात्काळ पंचनामे करून शासनाकडे सदरील पंचनामे पाठवून शेतकऱ्याला न्याय मिळवून द्यावा अशा सूचना केलेल्या आहेत. आज लामजना या गावांमध्ये जिल्हाप्रमुख शिवाजी माने गेले असता त्या गावातील शेतकऱ्यांनी टाहो फोडून सांगितले की आम्ही शेतकऱ्यांनी जगायचं तरी कसं. सोयाबीनचे झालेलं नुकसान आम्हाला मिळालेले नाही .पिक विमा योग्य प्रमाणात मिळालेला नाही. त्यातच आम्ही कुठेतरी रब्बी पिकावर अवलंबून होतो रब्बी पिकामध्ये मिळणारी ज्वारी या ज्वारीला कुठेतरी 38 00 ते 4000 रुपयापर्यंत भाव मिळत होता आणि शेतकऱ्याला वर्षभर घरी लागण्या एवढी ज्वारी ठेवून बाकीच्याला चांगला भाव मिळेल या अशेखाली खाली जगणारा शेतकरी आज हातचं आलेलं पीक गेल्यामुळे प्रचंड निराश आहेत असे चित्र दिसून येत आहे .आज ननंद,लामजना या गावी पंचनामे चालू असताना जिल्हाप्रमुख शिवाजी माने यांनी सदरील ठिकाणी भेट देऊन पंचनामे नुकसानीच्या प्रमाणात झाले पाहिजेत ज्या शेतकऱ्याचे जेवढ्या प्रमाणात नुकसान झालेल आहे त्या प्रमाणात पंचनामे करून शासनाकडे पाठवावेत पंचनामे वेगळे व शासनाकडे दिला जाणार अहवाल वेगळा असे असू नये यासाठी जिल्हाप्रमुख शिवाजी माने यांनी लामजना गावचे सरपंच, पोलीस पाटील ,तंटामुक्ती अध्यक्ष ,तलाठी, ग्रामसेवक ,व कृषी सहाय्यक यांनी संयुक्त पंचनामे करून झालेल्या पंचनाम्याची प्रत ग्रामपंचायतीला द्यावी जेणेकरून भविष्यात शेतकऱ्यावर अन्याय झाला तर त्या शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी ग्रामपंचायत कडे असणारे रेकॉर्ड उपयोगी पडेल असं नियोजन करावे असे सांगितले. होय सर्व शासकीय निमशासकीय कर्मचारी जुनी पेन्शन लागू करावी यासाठी संपात असले तरीही शेतकरी मायबाप अडचणीत आहेत अशावेळी आपण सर्वजण या शेतकऱ्याचे देण लागतो याच भावनेतून संपातून वेळ काढून शेतकऱ्याला या संकटातून सावरण्यासाठी आपण आपल्या पद्धतीने मदत करावी आपण असे अहवान शिवाजी माने यांनी केले. निश्चितच शेतकरी समाधान व्यक्त करतील शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांनी आपल्या संपाला पाठिंबा दिलेला असून लातूर जिल्ह्यातील सर्व शिवसैनिक आपल्या जाहीर पाठिंबा देत आहोत असेही जिल्हाप्रमुख शिवाजी माने यांनी सांगितले तसेच त्याच शेतकऱ्याच्या फडा वरून लातूर विभागाचे विभागीय कृषी अधिकारी श्रीमान दिवेकर साहेब यांना झालेल्या संपूर्ण नुकसानीचे वर्णन करून सांगितले व मी एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये उभा असून 95 टक्के नुकसान या शेतकऱ्याचे झालेलं आहे आपण आपल्या कर्मचाऱ्यामार्फत टीम मार्फत सर्व पंचनामे सत्य परिस्थितीवर आधारित शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी करावे अशीही मागणी केली. यावर विभागीय कृषी अधिकारी दिवेकर साहेब यांनी मी सर्व तालुका कृषी अधिकारी जिल्हा कृषी अधिकारी व माझ्या टीमला सांगून शेतकऱ्याच्या पाठीमागे खंबीरपणाने उभे राहतील अशा सूचना करतो सर्व पंचनामे व्यवस्थित करून घ्यायला सांगतो अशी आश्वासन दिले यावेळी औसा शिवसेना तालुकाप्रमुख तानाजी सुरवसे ,सलीम पटेल, श्रीमान मुगळे ,महेश सगर ,रामभाऊ पवार शाखाप्रमुख ,उप तालुका प्रमुख ,विभाग प्रमुख, लामजना गावचे सरपंच, तलाठी ,कृषी सेवक, पोलीस पाटील असंख्य असे शेतकरी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *