शिक्षकांनी संपात सहभागी होण्याचे संस्थाचालकाचे आवाहन – पालकांनी सहकार्य करण्याची विनंती
लातूर, दि.19 : शासकीय-निमशासकीय-शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्या पूर्वलक्षी प्रभावाने जुनीपेन्शन योजना लागू करण्यासाठी संप पुकारला आहे. आज जूने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात प्राथमिक-माध्यमिक शिक्षकांनी संपात सहभागी होण्याचे आवाहन संस्थाचालकांनी शिक्षकांना केले आहे. बैठकीस समन्वय समितीचे निमंत्रक संजय कलशेट्टी, महसूल संघटनेचे अध्यक्ष माधव पाचांळ, विभागीय अध्यक्ष रामदास पवार, जिल्हा उपाध्यक्ष जब्बार सगरे व सरचिटणीस ओम साकोळकर यांच्यासह विविध संस्थेतील शिक्षक व पदाधिकारी यांची बैठक झाली. लातूर शहरातील हजारोंच्या संख्येने शासकीय-निमशासकीय-शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्यासह अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनी संपात सहभाग घेतला. राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना व जुनी पेन्शन योजना याबाबत मध्यवर्ती संघटनेशी चर्चा न करताच लोकप्रतिनिधी माध्यमांना प्रतिक्रिया देत आहेत. सदरील प्रतिक्रिया या कर्मचाऱ्यांचे मनोबल खच्चीकरण करणाऱ्या असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये अशा प्रतिक्रिया बाबत नाराजी असून संतापही आहे. शासनाने कर्मचाऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय या सात ते आठ महिन्यात घेतलेले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजने ऐवजी जुनी पेन्शन योजनाकर्मचाऱ्यांना लागु करण्याचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा, अशी सर्व कर्मचाऱ्यांची भावना आहे. ही जुनी पेन्शन योजना लागू होत नाही तो पर्यंत कर्मचारी संपात सहभागी राहतील, असे कर्मचारी संघटनेच्या वतीने निमंत्रक संजय कलशेट्टी यांनी सांगितले. पालकांनी सहकार्य करण्याचे आवाहन हा संप जुनी पेन्शन योजना लागू व्हावी यासाठी सर्व शासकीय-निमशासकीय शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा असल्यामुळे शाळा बंद राहणार आहेत. त्यासाठी मुलांचा अभ्यास पालकांनी घरामध्येच पूर्ण करुन घ्यावा आणि या संपाला पाठिंबा द्यावा, अशी विनंती संस्थाचालकांनी पालकांना
केली
शिक्षकांनी संपात सहभागी होण्याचे संस्थाचालकाचे आवाहन
