राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस आणि गारपीट झाल्यामुळे शेतकऱ्याच्या पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. याच मुद्द्यावरूव विरोधकांनी सरकारला घेरलं आहे. तसेच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणीही विरोधक करत आहेत. तर नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे पंचनामे करण्यात येत असल्याचे सरकारच्यावतीने सांगण्यात येत आहे. आता याच मुद्यावरून संभाजीराजे छपत्रती सरकारवर संतापले आहेत.
इतकी असंवेदनशीलता कुठून येते? शेतकरी जगला तर तुम्ही जगाल. अशा शब्दात संभाजीराजे छपत्रती यांनी राज्य सरकारवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
काय आहे संभाजीराजे यांचे ट्विट?
अवकाळी पाठोपाठ गारपीटीने शेतकऱ्याला ग्रासले आहे. उभे पीक जमीनदोस्त झाले आहे. अशा परिस्थितीत राज्यसरकारने व कृषीमंत्र्यांनी शेतकऱ्याच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे असताना सरकार व कृषीमंत्री साधे धीर देतानाही कुठे दिसत नाहीत. इतकी असंवेदनशीलता कुठून येते SHETKARI गला तर तुम्ही जगाल. असे ट्विट संभाजीराजे छपत्रती यांनी केले आहे.दरम्यान, अवकाळीच्या तडाख्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. सरकारच्या मदतीची शेतकऱ्यांना आशा लागली आहे. मात्र, शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळाली नाही. त्यामुळेSAMBHAJI RAJE यांनी ट्विट करत आपला संताप व्यक्त केला आहे.