राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते आणि सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष UMESH PATIL हे सद्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्याबद्दल अवमानकारक आणि वादग्रस्त विधान केल्याबद्दल संत तुकाराम महाराज अनुयायांच्या मनात प्रचंड संताप आहे, त्या बागेश्वर धामच्या बागेश्वर महाराजांना सोलापुरात आणण्याबद्दलचा घाट घातला आहे, या संदर्भातील पोस्ट सोशल मीडियावर पाटील यांनी व्हायरल केल्यानंतर या नव्या वादाला तोंड फुटले आहे.
या प्रकरणात उमेश पाटील यांच्यावर नेटकऱ्यांनी टिकेची झोड उठवली आहे. त्यांना ट्रोल केले जात आहे. उमेश पाटील यांनी बागेश्वर महाराज यांच्या भेटीचे दोन फोटो आणि माहिती सोशल मीडियावर व्हायरल केली, त्यांनतर हा वाद उफाळला आहे. पाटील यांच्यावर सडकून टीका करताना नेटकरी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरही टीका केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील यांनी जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराजांच्या बद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या बागेश्वर धामचे बागेश्वर महाराज यांचे हात जोडून स्वागत केले. असा फोटोही त्यांनी आपल्या फेसबुकवरून पोस्ट केली होती. दरम्यान या पोस्टनंतर उमेश पाटील यांच्यावर नेचकऱ्यांनी टीका केली आहे. काहींनी त्यांचा निषेध ही केला आहे.हा फोटो त्यांनी आपल्या फेसबुकवर पोस्ट करत त्या खाली “लवकरचं सोलापूर नगरीत बागेश्वर धामचे सरकार धीरेंद्र शास्त्री यांची भेट बागेश्वर महाराज यांनी मला आवर्जून त्यांच्या दरबारी येण्याचे आमंत्रण दिले. धीरेंद्र कृष्ण शास्त्री हे बागेश्वर धाम सरकार म्हणून ओळखले जाणारे एक भारतीय महाकाव्य कथाकार आणि बागेश्वर धाम सरकार महाराज म्हणून प्रसिद्ध असलेले हिंदू आध्यात्मिक नेते आहेत. शास्त्री हे भारतातील मध्य प्रदेश राज्यातील छतरपूर जिल्ह्यातील प्रसिद्ध धार्मिक तीर्थक्षेत्र बागेश्वर धाम सरकारचे पीठाधीश्वर आहेत” असा उल्लेख केलेली पोस्ट पाटील यांनी आपल्या फेसबुक अकाउंट वरून टाकली आहे. दरम्यान या पोस्टनंतर उमेश पाटील यांच्यावर सर्व स्तरातून टीका होऊ लागली आहे. त्यांचा निषेध ही करण्यात येत आहे.
योगायोगाने भेट झाली ;अन्य काही नाही : उमेश पाटील यांचे स्पष्टीकरण-
दिल्लीला माझी आणि बागेश्वर बाबाची योगायोगाने भेट झाली. आपल्या संस्कृतीनुसार मी त्यांना अभिवादन केलं. माझी ओळख सांगितल्यानंतर त्यांनी मला त्यांच्या दरबारात येण्याचे निमंत्रण दिले. मीही त्यांना सोलापूरला येण्याचे निमंत्रण दिले. बस एवढेच झाले. महाराजांची विचारधारणा त्यांच्यासोबत आहे, माझी विचारधारणा माझ्यासोबत आहे. विचारधारा विसंगत असणाऱ्या व्यक्तीशी अभिवादन करायचे नाही, बोलायचे नाही हे कसं होऊ शकतं, अशी उमेश पाटील यांनी ‘माध्यमांशी’ बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.