BEED भाजपच्या नेत्या व माजी मंत्री pankaja munde यांनी बीडमध्ये भाजप पक्षाच्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांना संबोधित करत होते. यावेळी एक वेगळाच प्रसंग घडला. पंकजा मुंडे भाषण करत असताना अचानकपणे ‘कमळ’ पडलं. या प्रसंगाची आता सोशल मिडीयावर जोरदार चर्चा होत आहे. अनेक जण हा व्हिडीओ शेअर करत आहेत.
बीड जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाच्या बीड जिल्हा कार्यकारिणी बैठक आणि बूथ सशक्तीकरण प्रशिक्षण वर्ग कार्यक्रमात पंकजा मुंडे हे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत असताना हा प्रसंग घडून आला. पंकजा मुंडे या भाजपच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत होते, इतक्यात पाठीमागील बॅनरवरील कमळाचं चिन्ह खाली पडलं. यामुळे एकच चर्चा सुरू झाली. आता पंकजा मुंडे यांचा हा व्हिडीओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल आहेत.
पराभवाचं दुखं लोकांनी व्यक्त केले, हे अनुभवायला मिळालं :
पंकजा मुंडे (Pankaja Munde) बीड येथे बोलत होत्या. त्यावेळी त्यांनी पराभव झाल्याचा जास्त फायदाच झाल्याचे सांगितले. त्या म्हणाल्या, “पराभवामुळे वेळ मिळाला, त्या वेळेतून मला जे काही शिकायला मिळाले, मला जे अनुभवायला मिळाले ते अभूतपूर्व आहे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे माझ्या पराभवाचं दुःखं माझ्या मतदारसंघातील लोकांसह राज्यातील लोकांना झाले, हे अनुभवायला मिळाले, हे माझे मोठे भाग्य आहे.”
मुंडे पुढे म्हणाल्या, “मला केंद्रामध्ये काम करण्याची संधी मिळाली. केंद्रात काम करताना देशातील अत्यंत प्रगत मध्यप्रदेशात काम करायला मिळणे हे माझ्यासाठी भाग्याची गोष्ट. चार वेळा मुख्यमंत्री राहूनही शिवराज चौहानसारखे साधे, सरळ, मेहनती मुख्यमंत्री मी पाहिला नाही. त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मला पराभवामुळे मिळाली. सचिव म्हणून बैठक घेताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कार्यपद्धती अनुभवायला मिळत आहे”