latur जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर अवकाळी पाऊस व गारपीट अशी नैसर्गिक आपत्ती आली आहे. अवकाळी पावसात मोठ्या प्रमाणात सर्वदूर गारपीट झाली यामुळे रब्बी हंगामातील पिकाचे, फळबागांचे व भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. केंद्रात व राज्यामध्ये शेतकरी हिताचे सरकार आहे.
शेतकऱ्यांवर येणाऱ्या कोणत्याही नैसर्गिक संकटकाळात त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना दिलासा देण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत आहेत. तेंव्हा खचून जाऊ नका, असे अवाहन आमदार sambhaji patil nilangekar यांनी केले.
जिल्ह्यासह सर्वच तालुक्यात दोन-तीन दिवसापासून अवकाळी पाऊस, वादळी वारे व मोठी गारपीट झाली आहे. अचानक अवकाळी व गाराच्या पावसाने झोडपल्याने हे अस्मानी संकट शेतीतील रब्बी पिकावर आले आहे. यामुळे शेतकरी संकटात सापडला असून या संकटकाळात मदतीला राज्य सरकार निश्चितच मदत करणार आहे.
याबाबत पालकमंत्री गिरीष महाजन यांनी बैठक व गारपीट भागाचा दौरा केला असून नुकसानीचे पंचनामे करावे असे आदेश दिले आहेत. शिवाय निलंगा मतदार संघातील शेतीतील पिकाचे, फळबागांचे, भाजीपाला या पिकाचे नुकसानीचे पंचनामे करून अहवाल शासनाकडे तात्काळ सादर करावा अशी सूचना निलंगा उपविभागीय अधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांना दिली असल्याचे निलंगेकर यांनी दिले सांगितले.
आसमानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही याची काळजी घेण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत. देशातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार व महाराष्ट्रातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार हे शेतकरी हिताचे सरकार आहे. त्यामुळे नक्कीच शेतकऱ्यांना तात्काळ मदत करतील. शेतकरी बांधवांनी खचून जाऊ नये, मदत करण्यास सरकार कटीबध्द असल्याचे त्यांनी सांगितले.