केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह गोठवल्याने शिवसेनेला मोठा धक्का दिला होता. तसेच शिवसेनेतील ठाकरे गट आणि शिंदे गट या दोन्ही गटांना शिवसेना हे नाव वापरण्यात येणार नाही असं निवडणूक आयोगाने सांगितल्यानंतर आपापल्या गटाला काय नाव द्यायचं याबाबत दोन्ही गटात खलबलं सुरू होती.
यात आता शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या गटाचं नाव ठरवलं आहे. उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहीलं आहे. यात आपल्या गटाला ‘शिवसेना बाळासाहेब ठाकरे’ असं नाव देण्यात यावं अशी मागणी उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.