• Thu. Jun 19th, 2025

सर्वात मोठी बातमी! शिवसेनेचं निवडणूक चिन्ह धनुष्यबाण गोठवलं, शिवसेना पक्षाचे नावही वापरता येणार नाही

Byjantaadmin

Oct 8, 2022

 

अंधेरी निवडणुकीसाठी आयोगाचा निर्णय:शिवसेनेचे निवडणूक चिन्ह तात्पुरते आयोगाकडून गोठवले गेलं

अंधेरी निवडणुकीसाठी आयोगाकडून शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण आयोगाकडून गोठवले गेले आहे. शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही गटांना हे चिन्ह पोटनिवडणुकीसाठी वापरता येणार नाही, असा निर्णय निवडणूक आयोगाकडून देण्यात आला आहे. तर शिवसेना पक्षाचे नाव देखील या दोन्ही गटांना वापरता येणार नाही, नव्या चिन्हासाठी सोमवारी दुपारी एक वाजेपर्यंत आयोगाला पर्याय द्यायचे आहे, असा निर्णय आयोगाकडून देण्यात आला आहे. अंधेरी निवडणुकीत ठाकरे गट आधि शिंदे गट अशा नावाने निवडणूक लढवावी लागेल, अशी माहिती समोर येत आहे.

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शिंदे गतव (Eknath Shinde) लढाईत दोन्ही गटाला मोठा झटका बसला आहे. शिवसेनेचं निवडणूक चिन्ह धनुष्य बाण (Shivsena Election Symbol Bow And Arrow) गोठवण्यात आलं आहे. शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण आयोगाकडून गोठवलं गेलं आहे. शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही गटांना हे चिन्ह वापरता येणार नाही. शिवसेना पक्षाचे नाव देखील या दोन्ही गटांना वापरता येणार नाही. नव्या चिन्हासाठी सोमवारी दुपारी एक वाजेपर्यंत आयोगाला पर्याय द्यायचे आहेत, अशी माहिती मिळाली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *