दिल्ली-NCRमध्ये CNGच्या किमतीत 3 रुपयांनी वाढ झाली आहे. त्याचवेळी PNGच्या किमतीतही 5 रुपयांनी वाढ झाली आहे. CNBC कडून मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली-NCR मध्ये नवीन दर 8 ऑक्टोबरपासून म्हणजेच आज सकाळी 6 वाजेपासून लागू झाले आहेत. आता दिल्लीत प्रति किलो CNGची किंमत 78.61 रुपयांवर पोहोचली आहे. सध्या दिल्लीत प्रति किलो CNGची किंमत 75.61 रुपये होती.
आजपासून नवीन किंमत लागू झाल्यानंतर नोएडा, ग्रेटर नोएडा, गाझियाबादमध्ये प्रति किलो CNG 78.17 रुपयांऐवजी 81.17 रुपये मोजावे लागणार आहेत. त्याच वेळी, गुरुग्राममध्ये, CNG आता 83.94 प्रति किलो ऐवजी 86.94 प्रति किलो दराने उपलब्ध होईल.
PNG च्या दरांबद्दल बोलायचे झाल्यास त्याची किंमत 53.59 प्रति स्टँडर्ड क्यूबिक मीटर (SCM) पर्यंत वाढली आहे. नोएडा, ग्रेटर नोएडा आणि गाझियाबादमध्ये त्याचा दर 53 रुपये असेल. त्याच वेळी, मुझफ्फरनगर, शामली आणि मेरठमध्ये किंमत 56.97 वर पोहोचली आहे. कानपूर, फतेहपूर आणि हमीरपूरमधील दर 56.10 असतील.
मुंबईत CNGच्या दरात 6 रुपयांनी वाढ
या आठवड्याच्या सुरुवातीला मुंबईत गॅस वितरण कंपनी महानगर गॅस लि. (एमजीएल) CNGच्या दरात 6 रुपयांनी वाढ केली होती. मुंबईत सध्या CNGची किंमत 86 रुपये आहे. काही दिवसांपूर्वी पेट्रोलियम मंत्रालयाने नैसर्गिक वायूच्या दरात 40% वाढ केली होती. तेव्हापासून देशातील विविध शहरांमध्ये CNGच्या किमती वाढण्याचा अंदाज व्यक्त केला जात होता.
नैसर्गिक वायूच्या दरात वाढ झाल्याने CNG महाग
नैसर्गिक वायूच्या किमती वाढल्याने आता CNGच्या किमतीत वाढ होताना दिसत आहे. तज्ज्ञांच्या मते, सरकारने गेल्या आठवड्यात जुन्या गॅस क्षेत्रातून उत्पादित होणाऱ्या गॅससाठी दिलेला दर सध्याच्या 6.1 डॉलर प्रति मिलियन ब्रिटिश थर्मल युनिट (प्रति युनिट) वरून 8.57 डॉलर प्रति युनिट इतका वाढवला आहे. अशा परिस्थितीत येत्या काही दिवसांत CNGच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.