महिलांसाठी सुरु करण्यात आलेल्या मोफत सिटी बस सेवेच्या
वर्षपूर्तीचा आनंद महिला प्रवाशांसोबत केला साजरा
लातूर प्रतिनिधी:- राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या सूचनेनुसार लातूरमधील महिलांसाठी. ‘जे जे नवे, ते ते लातूरला हवे’, हा विचार समोर ठेवून दि. १८ मार्च २०२२ या दिवशी महिलांसाठी लातूरमध्ये मोफत सिटी बस सेवेची सुरवात करण्यात आली. या निर्णयाच्या वर्षपूर्तीनिमित्तने लातूर शहर जिल्हा महिला कॉंग्रेसने सिटी बस मधून प्रवास करणाऱ्या महिलांचा व कंडक्टर आणि ड्रायव्हर यांना गुलाब पुष्प देऊन आनंदोत्सव
साजरा केला. महिलांना मोफत सिटी बस सेवेचा लाभ देणारी लातूर शहर महानगरपालिका ही देशातील पहिली महानगरपालिका आहे, या वर्षभरात २५ लाखांहून अधिक महिलांनी मोफत सिटी बस सेवेचा लाभ घेतला आहे. लातूर शहर जिल्हा महिला कॉंग्रेसने महिला प्रवाशांशी संवाद साधला यावेळी अनेक महिलांनी माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांच्यामुळे लातूर शहरांत सिटीबस मधून मोफत प्रवास करता आला त्यामुळे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी गंजगोलाईतून विविध वस्तूंची खरेदी करणे, नोकरी, व्यवसाय, शिक्षण घेता येऊन आमचे पैसे बचत झाले त्याबद्दल माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांचे महिलांनी आभार मानले.
यावेळी लातूर शहर जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा प्रा.डॉ स्मिता खानापुरे, महाराष्ट्र प्रदेश महिला कॉंग्रेसच्या सचिव सपना किसवे, कमलताई मिटकरी, वर्षा मस्के, दीप्ती खंडागळे, सायरा पठाण, अनिता कांबळे, सुलेखा
कारेपूरकर, मीना टेंकाळे, सुनंदा कांबळे, तनुजा कांबळे आदीसह लातूर शहर जिल्हा महिला कॉंग्रेसच्या पदाधिकारी,महिला प्रवाशी नागरिक उपस्थित होते.