निलंगा:- कत्तीकार विलास माने लिखित गरिबीचा चिरंतन कोरोना या पुस्तकाचे प्रकाशन सोमवार दिनांक 20 मार्च रोजी सकाळी 11वाजता निलंगा येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष तथा ज्येष्ठ साहित्यिक व पत्रकार उत्तम कांबळे, शिवसेनेच्या उपनेत्या सुषमाताई अंधारे, माजी आमदार कॉम्रेड माणिकराव जाधव, जेष्ठ इतिहासकार प्राचार्य डॉ. सोमनाथ रोडे, साहित्य सांस्कृतिक मंडळाचे सदस्य विलास शिंदगीकर यांच्या शुभहस्ते संपन्न होणार असल्याची माहिती निलंगा येथे आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पद्मश्री उपराकार लक्ष्मण माने हे राहणार आहेत. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर, निलंगा उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिनेशकुमार कोल्हे, सामाजिक कार्यकर्ते तथा शिवसेना नेते लिंबण महाराज रेशमे, लातूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष पंडितराव धुमाळ रावणराजे अत्राम, नारायण जावळीकर, हरिभाऊ गायकवाड, डॉ. लालासाहेब देशमुख आदी मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
भटक्या विमुक्त संघटनेचे कार्यकर्ते विलास माने यांनी यापूर्वी सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व भटक्या विमुक्त चळवळीत काम करताना आलेल्या अनुभवावरून “कत्ती” व “वेदनेच्या पाऊलखुणा” ही दोन पुस्तके लिहिली आहेत. कोरोना रोगाच्या महामारीमुळे संपूर्ण मानवजात संकटात सापडला होता. या महामारीचा सर्वाधिक फटका गावकुसा बाहेर राहणाऱ्या वंचित, उपेक्षित वर्गाला व भटक्या विमुक्तांना मोठ्या प्रमाणात झाला. भटक्या मुक्तांसाठी सामाजिक, राजकीय आणि आर्थिक दारिद्र्य कोरोनापेक्षा भयंकर आहे.पिढ्यांनपिढ्यांनपासून हा समाज कोरोनाची दाहकता अनुभवत असल्याचे सांगत
विलास माने यांनी *गरिबीचा चिरंतन कोरोना* या पुस्तकात आपले विविध अनुभव कथन केले आहेत. या पुस्तकाचे
सोमवारी सकाळी 11 वाजता निलंगा येथील डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर सांस्कृतिक सभागृह टाऊन हॉल येथे या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आले आहे. या प्रकाशन सोहळा कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.या पत्रकार परिषदेस लेखक विलास माने, पंडितराव धुमाळ, अजित माने, विलास सूर्यवंशी, दयानंद चोपणे, रोहित बनसोडे, अंकुश ढेरे, रजनीकांत कांबळे, गोविंद सूर्यवंशी, रामलिंग पटसाळगे, दिगंबर सूर्यवंशी, नागनाथ घोलप, माधवराव पाटील, दत्तात्रय सुर्यवंशी आदींसह संयोजन समितीचे सदस्य उपस्थित होते.
कत्तीकार विलास माने लिखित गरिबीचा चिरंतन कोरोना या पुस्तकाचे प्रकाशन सोमवारी
