• Fri. May 9th, 2025

विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या सार्वजानिक जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी माजी सब-रजिस्ट्रार अधिकारी व समाजसेवक रजनीकांत (आबा) कांबळे यांची एकमताने निवड

Byjantaadmin

Mar 18, 2023

विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या सार्वजानिक जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी माजी सब-रजिस्ट्रार अधिकारी व समाजसेवक रजनीकांत (आबा) कांबळे यांची एकमताने निवड

निलंगा:-मिलिंद नगर येथील समाजमंदिर मध्ये विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती निमित्त बैठकीचे आयोजन
करण्यात आले होते,या बैठकीमध्ये माजी सब-रजिस्ट्रार अधिकारी व समाजसेवक रजनीकांत(आबा) कांबळे यांची विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या सार्वजनिक जयंती समितीच्या अध्यक्ष पदी सर्वानुमते निवड करण्यात आली या वेळी ईतर ही पदाधिकाऱ्यांचीही एकमताने निवड करण्यात आली
उपाध्यक्ष पदी – माजी नगरसेवक मुरलीधर भाऊ कांबळे व सामजिक कार्यकर्ते रमेश (अण्णा ) कांबळे यांची निवड करण्यात आली*तसेच प्रसिध्दी प्रमुख म्हणून दलीत चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते माधव नाना सूर्यवंशी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली
कोषाध्यक्ष म्हणून प्रदिप उर्फ बंटी कांबळे तर सहकोषाध्यक्ष म्हणून सामजिक कार्यकर्ते अंकुश कांबळे यांची निवड करण्यात आली
तसेच सल्लागार पदी – अमोल बापू कांबळे
सहसल्लगर- राहूल कांबळे,सचिव पदी योगेश सूर्यवंशी संघटक पदी सुमित गायकवाड, सहसंघटक पदी* *शुभम सूर्यवंशी सजावट प्रमुख म्हणून सचिन भाऊ कांबळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली
यावेळी झालेल्या बैठकीत विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती हे १एप्रिल ते १४ एप्रिल पर्यंत विविध प्रकारच्या लैजिम,झांज पथक, लाठ्या काठ्या चालवणे अश्या अनेक प्रकारच्या उपक्रमाने व ढोल ताश्याच्या गजरात डोळ्याचे पारणे फिटेल अशी भव्य दिव्य मिरवणुकी काढण्याचे आयोजन करण्यात येणार आहे अशी माहिती सार्वजनिक जयंती समितीचे अध्यक्ष मा.रजनीकांत(आबा) कांबळे यांनी दिली.
बैठकीला मिलिंद नगर येथील २०० युवक व असंख्य महिला व पुरुष उपस्थित होते व अत्यंत जोशपूर्ण वातावरणात ही बैठक संपन्न झाली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *