राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी एका युवतीवर अत्याचार केल्याचा आरोप भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केला होता. याप्रकरणी मेहबूब शेख यांनी चित्रा वाघ यांच्यावर ५० लाख रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा केला आहे.
त्याविरोधात चित्रा वाघ यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) खंडपीठात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाने चित्रा वाघ यांचे अपील फेटाळले आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
MAHEBOOB SHAIKH यांनी अत्याचार केल्याचा आरोप औरंगाबाद शहरातील 29 वर्षीय तरुणीने केला होता. या प्रकरणात भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी त्यावेळच्या महाविकास आघाडी सरकारवर टीका केली होती.
मेहबूब शेख यांच्याविरोधात मोर्चा उघडला होता. नंतर याच मुलीने घुमजाव करत चित्रा वाघ यांनीच आपल्याला तसे आरोप करायला सांगितलं होतं असं म्हटलं होतं.
या प्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात मेहबूब शेख यांच्याविरोधात बलात्काराची तक्रार दाखल करण्यात आली होती.याप्रकरणात मेहबूब शेख यांनी तेव्हा फेसबूक पोस्ट करीत चित्रा वाघ यांच्यावर निशाना साधला होता. त्यांनी वाघ यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा केला आहे.
मेहबूब शेख यांनी फेसबूक पोस्टमध्ये म्हटलं होते की…
“संविधानाने बोलण्याचे व्यक्तिस्वातंत्र्य दिले असले तरी काय बोलले नाही पाहिजे याचेही नियम दिले आहेत. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर आणि त्याचाच गैरवापर केला तर काय परिणाम होतात हे चित्रा वाघ यांना आता लक्षात येईल. स्वतः न्यायाधीश असल्यासारखे एखाद्याला आरोपी ठरवून बेताल वक्तव्य करताना यापुढे विचार करा. स्वतःला न्यायधीश समजणाऱ्या चित्रा वाघ यांनी शिरूर कासार येथे येऊन माझ्याविषयी जी बदनामीकारक वक्तव्य केले, त्याच्या विरोधात मी शिरूर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली. त्याच्यानंतर शिरूरच्या न्यायालयामध्ये कलम 499 आणि 500 प्रमाणे क्रिमिनल डीफामेशनची खाजगी तक्रार दाखल केली. माननीय कोर्टाने 202 प्रमाणे POLICE चौकशी करून त्या पोलिस चौकशीच्या अहवालानंतर सदरील तक्रारीची दखल घेऊन ते स्वीकृत केले आहे