• Thu. Aug 14th, 2025

10 महिन्यांच्या चिमुकलीला सोडून कोल्हापूरची रणरागिणी निघाली सीमेवर…

Byjantaadmin

Mar 17, 2023

आपल्या देशात खरे कर्तव्य कोण बजावत असेल तर ते आपल्या देशाचे सैनिक आहेत. सीमेवर तैनात असलेले जवान आपल्या घरापासून दूर राहतात.

विशेष म्हणजे, ते स्वतःचा जीव धोक्यात घालून आपले रक्षण करतात.

आपल्या जीवनात त्यांचे योगदान फार मोठे आहे, ज्याची परतफेड कधीही केली जाऊ शकत नाही. आता तुम्ही विचार करत असाल की आज आम्ही तुमच्याशी सैनिकांबद्दल का बोलत आहोत?

सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर तुमचे डोळे पानावतील.

10 महिन्यांची मुलगी सोडून देशसेवेसाठी बाहेर पडली

सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक महिला सैनिक ट्रेनच्या गेटवर उभी असल्याचे दिसत आहे. या महिला सैनिकाचे नाव वर्षा पाटील असे आहे.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, त्यांच्या डोळ्यातून अश्रू येत आहेत. त्याचवेळी, वर्षा यांचे कुटुंबीयही दिसत आहे. त्या आपल्या प्रियजनांपासून दूर जात आहे.

व्हिडीओबाबत असाही दावा केला जात आहे की, वर्षा या 10 महिन्यांच्या मुलीला सोडून ड्युटीवर जात आहेत.

व्हिडिओमध्ये दिसत आहे की, ड्युटीवर जात असताना वर्षा यांचे कुटुंबीय रेल्वे (Railway) स्टेशनवर सोडण्यासाठी आले आहे. असा क्षण तुमच्याही आयुष्यात अनेकदा आला असेल, जेव्हा तुम्हीही तुमच्या घरापासून दूर गेला असाल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *