• Thu. May 8th, 2025

विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा कारखान्यास ब्राझीलचे अभ्यास पथकाची भेट 

Byjantaadmin

Mar 16, 2023

विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा कारखान्यास ब्राझीलचे अभ्यास पथकाची भेट

विलासनगर : महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री  लोकनेते विलासरावजी देशमुख  यांचे नेतृत्व व मार्गदर्शनाखाली उभारणी होऊन आपले नावाचा संपुर्ण देशभरात आदर्श नावलौकीक कमावलेल्या विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्यास ब्राझील देशाचे अभ्यास पथकाने भेट दिली आहे.

कारखान्याचा मागील हंगामामध्ये कारखाना कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणात झालेली ऐतिहासीक ऊस लागवड व सदर संपूर्ण ऊसाचे गाळप पुर्ण करणेसाठी लागलेला कालावाधी, दिवसें दिवस ऊस तोडणीसाठी मजूरांची होत असलेली टंचाई विचारात घेता मांजरा साखर परिवाराचे मार्गदर्शक व दुरदर्शी नेतृत्त्व असलेले कारखान्याचे चेअरमन सहकार महर्षि म दिलीपराव देशमुख  यांनी ऊस तोडणीसाठी यंत्राचा वापर करणेबाबतचा निर्णय घेतला. त्यानुसार मांजरा कारखान्याने लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. च्या संयुक्त विद्यमाने कारखाना कार्यक्षेतील तरूण व तोडणी वाहतुक ठेकेदाराना एकुण ४४ ऊस तोडणी यंत्र वाटप केली आहेत. या ऊस तोडणी यंत्राने चालू हंगामामध्ये ऊस तोडणी करून कारखान्याकडे जवळपास ७५ टक्के ऊस गळीतास आणला आहे.

मांजरा कारखान्याच्या राबवलेल्या या आदर्श उपक्रमाची प्रशंसा व चर्चा साखर उद्योगात राज्य व देश पातळीवर चालू आहे. चालू असलेल्या आदर्श प्रशंसा व चर्चेची नोंद आंतरराष्ट्रीय पातळीवर उत्तर ब्राझील देशांने घेतली आहे. त्या अनुषंगाने आज रोजी उत्तर ब्राझील मधील साखर उद्योगात अग्रगन्य असलेली साखर उत्पादक कंपनी मे उसीना सेर्रा ग्रांडे एस चे संचालक श्री लुईझ निट्सच, शेतकी सल्लागार श्री लुईझ क्लाऊडिओ व मॅनेजर श्री फान्सीसको कैंसर यांनी मांजरा कारखान्यास भेट दिली. त्यावेळी हार्वेस्टर उत्पादक कंपनीचे प्रतिनिधी, कारखान्याचे कार्यकारी संचालक व खाते प्रमुख उपस्थित होते. या भेटी दरम्यान कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री जितेंद्र रणवरे यांनी कारखान्याच्या कामकाजा विषयी सविस्तर माहिती देऊन त्यांचा यथोचित सत्कार केला. अभ्यास पथकाने कारखाना यंत्रसामुग्री व परिसरास तसेच कारखान्याकडे ऊस तोडणी यंत्राद्वारे गळीतासासाठी येत असलेल्या ऊसाची पाहणी केली. त्याच बरोबर ऊस तोडणी यंत्राने चालू असलेल्या ऊस फडास प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. उत्तर ब्राझीलमध्ये आजही ऊस तोडणीसाठी मोठ्या प्रमाणावर मनुष्य बळाचा वापर करण्यात येतो. कारखान्या मार्फत राबवण्यात येत असलेल्या या स्तुत्य उपक्रमांची सदर अभ्यास गटाने प्रशंसा करून समाधान व्यक्त केले व कारखान्याच्या पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या, माजरा कारखान्याचे राबवलेल्या

उपकमा प्रमाणे अशा प्रकारचा उपक्रम त्यांचेकडेही राबवणार असल्याचे बोलून दाखवले आहे. विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा कारखान्याने हंगामातील ७५ टक्के ऊसाची तोडणी यंत्राने करण्याच्या राबवलेल्या उपक्रमाचा आदर्श नावलौकीक आपले राज्य व देशाबरोबरच आंतरराष्ट्रीय पातळीवर होत असलेने कारखान्याचा नावलौकीक होत आहे. कारखान्याच्या या आदर्श व यशस्वी वाटचालीस महाराष्ट्र राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतीक कार्यमंत्री आ. अमित विलासराव देशमुख  व लातूर विधानसभा ग्रामीण मतदार संघाचे आमदार धीरज  विलासराव देशमुख  यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *