नाशिकमधील दिंडोरी ते मुंबईतील आझाद मैदानापर्यंत सुमारे 10 हजार शेतकरी पायी आंदोलन करत आहेत. सोमवारपासून सुरू झालेली शेतकऱ्यांची पदयात्रा बुधवारी कसारा घाटातून पार पडली. ड्रोनमधून इथे पाहिल्यावर एखादा ड्रॅगन रस्त्यावरून चालल्याचा भास झाला. हे शेतकरी आदिवासींना जमिनीवरील हक्क, कांद्यावरील एमएसपी आणि कर्जमाफीची मागणी करत आहेत.
मुंबईचे आझाद मैदान दिंडोरीपासून 203 किलोमीटर अंतरावर आहे. शेतकरी दररोज 25 किलोमीटर पायी चालतात. चालत असताना ते त्यांच्या मागण्यांच्या समर्थनार्थ घोषणा देतात. ते जिथे मुक्काम करतात, तिथे चूल पेटवून अन्न शिजवून खातात आणि आंदोलनाची रणनीती बनवतात. सध्या शेतकरी मुंबईपासून 100 किलोमीटर दूर आहेत. शेतकऱ्यांना 20 मार्चला मुंबई गाठून निदर्शने करायची आहेत.
शेतकरी नेत्यांची प्रशासनाशीही बोलणी सुरू आहेत. प्रशासनाकडून मागण्यांच्या पूर्ततेचे आश्वासन सातत्याने मिळत असले तरी मागण्या पूर्ण करण्याची घोषणा सरकारने करावी, अशी मागणी शेतकरी नेते करत आहेत.
अखिल भारतीय किसान सभा आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली काढण्यात येत असलेल्या मोर्चात जे.पी.गावित, डाव्या पक्षाचे अजित नवले आदी नेते आणि नाशिक जिल्ह्यातील बागलाण, कळवण, दिंडोरी तालुक्यातील आदिवासी मजूरही शेतकऱ्यांसोबत आहेत.