महाराष्ट्र महाविद्यालयातील विद्यार्थ्यानी भिंती पत्रकांमधून मांडली संगणकाची भाषा
निलंगा येथील महाराष्ट्र महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी भित्ती पत्रकाच्या माध्यमातून संगणक क्षेत्रात वापरल्या जाणाऱ्या विविध भाषांची माहिती मांडली. संगणकाच्या क्षेत्रात आज मिळालेले ज्ञान दुसऱ्या दिवशी बाद ठरते अशी अवस्था आहे. या नवनवीन तंत्रज्ञानाची ओळख विद्यार्थ्यांना व्हावी या उद्देशाने या भित्ती पत्रकाचे आयोजन संगणक शास्त्र विभागाच्या वतीने करण्यात आले होते. या भिंती पत्रक स्पर्धेत 50 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. त्यातून विद्यार्थ्यांनी. C.C++, JAVA, PYTHON, PHP, SAP, ANDROID, LINUX. यासारख्या विविध भाषांचा संगणकात कसा वापर केला जातो व सॉफ्टवेअर बनविण्याकरिता त्याचा कसा वापर होतो हे भित्ती पत्रकाच्या माध्यमातून दाखविण्याचा प्रयत्न केला. या भित्ती पत्रकाचे उद्घाटन भौतिकशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख. कॅप्टन. डॉ. सी. जे.कदम यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी IQAC चे समन्वयक डॉ. ज्ञानेश्वर चौधरी, रसायन शास्त्र विभागाचे प्रा. सुरेश कुलकर्णी, डॉ.हंसराज भोसले आदि उपस्थित होते.परीक्षक म्हणून आजादी का अमृत महोत्सव समितीचे समन्वयक. डॉ. भास्कर गायकवाड, इंग्रजी विभाग प्रमूख डॉ. अजित.मुळजकर, प्रा. धनराज किवडे यांनी काम पाहिले. यावेळी बीसीए विभागाचे प्रमुख प्रा.रवींद्र मदरसे, प्रा.गिरीश पाटील , प्रा.मयूर शिंदे , प्रा. शुभांगी शहापूरे , प्रा.संगीता जाधव, सिद्धेश्वर कुंभार, सचिन महिंद्रकर यांचीही उपस्थिती होती. या स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना कॅप्टन डॉ. सी. जे.कदम यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आलीत.