• Thu. May 8th, 2025

राज्य सहकारी साखर संघ मुंबईच्या तज्ज्ञ संचालकपदी माजी मंत्री दिलीपराव देशमुख 

Byjantaadmin

Mar 15, 2023

राज्य सहकारी साखर संघ मुंबईच्या तज्ज्ञ संचालकपदी माजी मंत्री दिलीपराव देशमुख
लातूर : (प्रतिनिधी)महाराष्ट्र राज्य सहकारी साखर संघ मुंबईच्या तज्ज्ञ संचालकपदी राज्याचे माजी मंत्री, सहकारमहर्षी, सहकारी कारखानदारीत प्रदीर्घ अनुभव असलेले विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष दिलीपराव देशमुख यांची निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे राज्यातून तज्ज्ञ संचालकपदी निवड झाल्याबद्दल राज्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवर, लोकप्रतिनिधी, सहकार क्षेत्रातील दिग्गजांनी दिलीपराव देशमुख यांचे अभिनंदन केले आहे.

राज्य सहकारी साखर संघ हा राज्यातील सहकारी साखर कारखान्याच्या उन्नतीसाठी प्रयत्न करत असतो तसेच कारखान्याचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी कामगार, कर्मचारी यासाठी सरकार पातळीवर प्रशासनासोबत कारखान्याची बाजू मांडून प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी पुढाकार घेण्याचे काम या राज्य सहकारी साखर संघाच्या माध्यमातून होत असते. राज्यातून तज्ज्ञ संचालकपदी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, माजी अर्थ राज्यमंत्री दिलीपराव देशमुख यांची निवड करण्यात आली आहे.

सहकारमहर्षि दिलीपराव देशमुख यांची निवड सार्थ
राज्य सहकारी साखर संघावर तज्ज्ञ संचालक म्हणून माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांची झालेली निवड सार्थ व योग्य आहे. यामध्ये प्रामुख्याने दिलीपराव देशमुख यांचा सहकार व साखर इंडस्ट्रीमधील गेल्या ४० वर्षांचा अनुभव, त्यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा सहकारी साखर परिवारातील सर्व ९ साखर कारखाने त्यांच्याच मार्गदर्शनाने अतिशय चांगल्या पद्धतीने पारदर्शकता ठेवून कार्य करीत आहेत.

त्यांनी उभ्या केलेल्या सहकार क्षेत्रातील संस्था अव्वल स्थानावर आहेत. लातूर जिल्ह्यातील विविध सहकारी संस्था त्यांच्याच मार्गदर्शनाखाली अतिशय चांगल्या प्रकारे पारदर्शकता ठेवून अचूक कार्य करत आहेत त्यामुळे माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांची निवड सार्थ ठरली आहे. राज्यातून झालेल्या या निवडीने लातूरकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *