जनसुविधा अंतर्गत औसा मतदारसंघातील ३ कोटी ७१ लाखांच्या कामांना मंजुरी :आमदार अभिमन्यू पवार यांचा पाठपुरावा
औसा – आमदार अभिमन्यू पवार यांच्या पाठपुराव्यामुळे औसा विधानसभा मतदारसंघात विविध माध्यमांतून निधीचा ओघ वाढत असून यंदाच्या अर्थसंकल्पात तब्बल १०३ कोटींचा निधी मंजूर झाल्यानंतर आता जिल्हा वार्षिक योजना २०२२-२३ जनसुविधा विशेष अनुदान योजनेअंतर्गत प्रस्तावित कामासाठी ३ कोटी ७१ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामधून मतदारसंघात वेगवेगळ्या ६६ कामासाठी हा निधी खर्च केला जाणार आहे.
आमदार अभिमन्यू पवार यांच्या पाठपुराव्यामुळे जिल्हा वार्षिक योजना जनसुविधा विशेष अनुदान योजनेअंतर्गत स्मशानभूमी शेड बांधकाम करणे, स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता निर्माण करणे, गावांतर्गत सिमेंट,पेव्हर ब्लॉक रस्ते निर्माण करणे, नवीन ग्रामपंचायत बांधकाम करणे व ग्रामपंचायत दुरुस्ती काम करणे इत्यादी ६६ वेगवेगळ्या कामांसाठी ३ कोटी ७१ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.स्मशानभूमीअभावी अनेक गावांमध्ये मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना अडचणींना तोंड द्यावे लागते, कधीकधी अनावधानाने प्रेताची विटंबनाही होते. हे सर्व टाळण्यासाठी मतदारसंघातील प्रत्येक गावात स्मशानभूमी निर्माण करून देण्याचा निर्धार आमदार अभिमन्यू पवार यांनी केला असून तो लवकरच तडीस जाईल.औसा विधानसभा मतदारसंघात आमदार अभिमन्यू पवार यांच्या प्रयत्नाने विविध विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होत असून त्या माध्यमातून मतदारसंघात विकास कामांना गती मिळाली आहे. जिल्हा वार्षिक योजनेतून निधी मंजूर केल्याबद्दल त्यांनी लातूरचे पालकमंत्री गिरीश महाजन यांचे आभार मानले आहेत