• Thu. May 8th, 2025

सरकार टिकवण्यासाठी सर्व अस्थिर करण्याचा प्रयत्न:उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल

Byjantaadmin

Mar 15, 2023

सरकार टिकवण्यासाठी सर्व अस्थिर करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोप करत बुधवारी उद्धव ठाकरे यांनी सरकारी नोकर भरतीच्या खासगीकरणाला कडाडून विरोध केला. शेतकऱ्यांचा मोर्चा मुंबईकडे निघाला आहे. याआधीच्या मोर्चाला शिवसेनेचे नेते समोर गेले होते. बळीराजा आक्रोश करत असताना सरकारला त्यांच्यासाठी वेळ नसल्याचा आरोप त्यांनी केला.

शेतकऱ्यांशी बोलून राज्य सरकारने त्यांचे प्रश्न सोडवायला हवे, सरकारने शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला हवे. मात्र, हे सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर गंभीर नाही. मुंबईतील व्यवसाय आणि कार्यालय हे दुसऱ्या राज्यात जात आहे, असा टोलाही त्यांनी राज्य सरकारसह केंद्राला लगावला.

सरकार शेतकऱ्यांबाबत गंभीर नाही

शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आमचे नेते त्यांच्यापर्यंत गेले होते. मात्र, हे सरकार शेतकऱ्यांबाबत गंभीर नाही. त्यांनी शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला हवे, असा घणाघात उद्धव ठाकरेंनी राज्य सरकारवर केला आहे. तर राज्य सरकारकडून सरकार टिकविण्यासाठी सर्व अस्थिर करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

अडवाणींच्या काळात पेन्शन योजना रद्द

जुनी पेन्शन योजना लागू करायला हवी, आमचा त्यासाठी पाठिंबा आहे, केंद्राची शक्ती पाठीमागे असताना योजनेला काय समस्या आहेत, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. तर अडवाणींच्या काळात ही योजना रद्द करण्यात आली असेही त्यांनी म्हटले आहे.

पंचामृत म्हणजे पोटभर नाही

राज्याच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संपावर बोलताना उद्धव ठाकरेंनी जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी आमचा पाठिंबा आहे, असे जाहीर केले आहे. या सरकारच्या पाठीशी केंद्र सरकारची महाशक्ती असताना हे ओझे पेलवणे त्यांना अवघड नाहीये, असेही उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागण्ध्या पूर्ण करायला काहीच हरकत नाही. निवृत्तीनंतर त्यांना जगण्यासाठी त्यांना मदत करणे गरजेचे आहे. पंचामृत योजनेचा अर्थ हा हे सरकार कुणाला पोटभर मिळणार नाही असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला आहे.

सगळे केंद्राच्या हाती

प्रत्यक्ष सरकार चालविणाऱ्या लोकांना जर तुम्ही झटकत असाल तर हे अगदी चुकीचे आहे. सरकारी भरती ही खासगी संस्थेच्या माध्यमातून भरायचे असे कारभार राज्य सरकारचा सुरू असल्याचा आरोपही उद्धव ठाकरेंनी केला आहे. तर केंद्र सरकारच्या हाती सगळे देऊन केवळ स्वामी भक्त व्हायचे असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *