• Thu. May 8th, 2025

प्लास्टिक बॅगमध्ये सापडले महिलेच्या मृतदेहाचे तुकडे:मुलीने अनेक महिने कोंडून ठेवले, नंतर खून केला : पोलिसांना संशय

Byjantaadmin

Mar 15, 2023

मुंबईतील लालबाग परिसरातील अपार्टमेंटमध्ये एका 53 वर्षीय महिलेचा कुजलेला मृतदेह प्लास्टिकच्या पिशवीत आढळला आहे. महिलेचा भाऊ आणि पुतण्याने काही दिवसांपूर्वी काळाचौकी पोलीस ठाण्यात महिला हरवल्याची तक्रार नोंदवली होती. त्यानंतर पोलिस शोधासाठी महिलेच्या घरी पोहोचले. दरम्यान, त्यांना एका प्लास्टिकच्या पिशवीत महिलेचा मृतदेह आढळून आला. मृतदेहाचे हात, पाय काही भाग कापलेले होते.

मृत्यूचे कारण शोधण्यासाठी पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. यासोबतच त्यांच्या मुलीलाही चौकशीसाठी अटक करण्यात आली आहे.

महिला अनेक महिन्यांपासून कपाटात बंद होती
डीसीपी प्रवीण मुंढे यांनी सांगितले की, वीणा प्रकाश जैन असे महिलेचे नाव आहे. 22 वर्षीय मुलीला चौकशीसाठी अटक करण्यात आली आहे. मुलीनेच आईला अनेक महिने कोंडून ठेवल्याचा पोलिसांना संशय आहे. यानंतर त्यांची हत्या करण्यात आली. हरवलेल्या अहवालाच्या आधारे घराची झडती घेतली असता महिलेचा मृतदेह सापडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *