प्राचार्य. डॉं. सिध्देश्वर पाटील यांचा नगरसेवक सुधीर लखनगावे यांनी केला सत्कार
शिरूर अनंतपाळ:-स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथील फार्माकोलाँंजी अभ्यासमंडळाच्या चेअरमनपदी महाराष्ट्र काँंलेज आँंफ बी.फार्मसी, निलंगा येथील प्राचार्य. डॉं. सिध्देश्वर पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे..
अभ्यास मंडळाची निवडणुक प्रकीया नुकतीच
स्वा.रा.ती.म.विद्यापीठ, नांदेड येथे पार पडली यात विद्यापीठ कार्यक्षेत्रातील नांदेड,लातुर,परभणी,हिंगोली जिल्हापैकी लातुर जिल्हातील निलंगा येथे ग्रामीण भागातील विद्यार्थींना ऊच्य तंत्रशिक्षण मिळण्यासाठी 1981 साली कर्मयोगी स्व.डाँं.शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी दुरदृष्ठी ठेऊन स्थापन केलेल्या महाराष्ट्र काँंलेज आँंफ फार्मसी,निलंगा येथील प्राचार्य.डाँं.सिध्देश्वर पाटील यांची फार्मसी अभ्यासमंडळाच्या चेअरमनपदी बिनविरोध निवड झाली..
प्राचार्य. डाँं.पाटील यांचे 2 फार्मसी ग्रंथ प्रकाशीत असुन यासोबतच 43 राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय शोधनिबंध प्रकाशीत आहेत…त्यांच्या निवडीबद्दल काँंलेजचे माजी विद्यार्थी तथा शिरुर अनंतपाळ नगरपंचायतीचे उच्यशिक्षीत नगरसेवक सुधीर लखनगावे यांनी हद्दयपुर्वक सत्कार करत गुरुप्रती प्रेम व्यक्त केले..
यावेळी माजी विद्यार्थी तथा नगरसेवक सुधीर लखनगावे, प्रा.डाँं.सुनिल गरड, प्रा.सुरेश हानपुडे,प्रा.डाँं.माधव शेटकार,प्रा.रविराज मोरे,प्रा.डाँं.चंद्रवर्धन पांचाळ,प्रा.संतोष कुंभार,प्रा.विनोद ऊसनाळे,प्रा.परवेझ शेख, प्रा.प्रिती माकणे, प्रा. ईरशाद शेख, नगरसेवक.ऋषिकेश आवाळे, सतिश एरंडे, राजेश्वर एरंडे यांच्यासह सर्व विभाग प्रमुख प्राध्यापक,शिक्षकेत्तर कर्मचारांनी प्राचार्य. डाँं.पाटील यांचे अभिनंदन केले.