सर्वच विभागातील कर्मचारी बेमुदत संपावर गेल्याने शासकीय कार्यालयात शुकशुकाट
जुनी पेन्शन योजना लागू करा म्हणत कर्मचारी रस्त्यावर..
निलंगा/प्रतिनिधी
जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी सर्वच विभागातील शेकडो कर्मचारी संपावर गेल्याने कार्यालयात शुकशुकाट दिसत होता तर कामानिमित्त आलेल्या लोकांना याचा मोठा फटका बसल्याचे चिञ दिसून आले.
महसुल विभागासह निलंगा शहरातील सर्वच विभागातील कर्मचारी दिनांक १४ रोजी पासून काम बंद आंदोलन व बेमुदत संपावर गेल्यामुळे
शहरातील तहसिल,उपविभागीय अधिकारी कार्यालय,पंचायत समिती,बांधकाम विभाग,आरोग्य विभाग,भूमि अभिलेख,शिक्षण विभाग यांच्यासाह सर्वच कार्यालयातील शेकडो कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपाचे हात्यार उपसल्यामुळे ग्रामीण भागातील कामानिमित्त आलेल्या लोकांची मोठी तारांबळ उडाली काम न झाल्याने अनेकाना निराशापोटी घरी जावे लागल्याने त्यानी नाराजी व्यक्त केली आहे.
महसूल व शिक्षकेतर समन्वय समीतीचे तालुकाध्यक्ष महसूल विभागाचे कर्मचारी गंगाराम सुर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली १४ मार्च रोजी बेमुदत संप पुकारून सर्वच कर्मचाऱ्यांनी छञपती संभाजी महाराज चौक ते छञपती शिवाजी महाराज चौका पर्यंत राज्य शासनाच्या विरोधात आवज उठवत घोषणा देत मोर्चा काढला होता.त्यानंतर पंचायत समिती कार्यालयाच्या आवारात सदरील मोर्चाचा समारोप करण्यात आला.
तालुकाध्यक्ष गंगाराम सुर्यवंशी,शिक्षक समितीचे अरूण साळुंके,संजय कदम,राहूल मोरे,बळवंत सरवदे,बब्रूवान सोनटक्के,आनंद जाधव,राम सगरे,गणेश गायकवाड तानाजी सोमवंशी,विजयसिंह मोरे, गोरख भोजने,प्रल्हाद रिट्टे, विठ्ठल हुगेवाड,यांच्यासह सर्वच विभागातील कर्मचाऱ्यांचा या संपात समावेश होता.