शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुखudhav thakre अडचणी संपताना दिसत नाहीत. ठाकरेंचे निकटवर्तीय व विश्वासातले, शिवसेना नेते व माजी मंत्री सुभाष देसाई यांचे पुत्र भूषण देसाई यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यामुळे वडील ठाकरेंकडे तर पुत्र शिंदेकडे असे चित्र निर्माण झाले. हा धक्का ताजा असतानाच आता ठाकरेंना आणखी एक धक्का बसला आहे. आता शिवसेना नेते व माजी मंत्री बबनराव घोलप यांची मुलगी तनुजा घोलप भाजपात प्रवेशाची तयारी करत आहेत.