राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू असून अर्थसंकल्प सादर झाला आहे. अधिवेशनात अर्थसंकल्पासह विविध मुद्द्यांवर चर्चा होत असताना काल कांद्याच्या मुद्द्यावरुन वातावरण तापले होते. तर आजपासून राज्यातील 17 लाख कर्मचारी हे जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी बेमुदत संपावर आहे. यामुद्द्यावर सरकारविरोधात आज विरोधक आक्रमक होऊ शकतात. तर आज अधिवेशनात कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्त्वाच्या अपडेट
- कृषीमंत्री अब्दुल सत्तारांविरोधात विरोधक आक्रमक; विधीमंडळाच्या पायऱ्यावर आंदोलन
- सरकारने आपली भूमिका स्पष्ट करायला हवी; सरकारने सर्वांना विश्वासात घेऊन काम करायला हवे,अन्य राज्यामधे योजना लागू झाल्याने आपल्याकडेही मागणी,कर्मचारी आणि सरकारने समजंसपणा दाखवावा, यामुळे राज्यात विद्यार्थी, आरोग्यविभाग सर्वांनाच त्रास होईल असे अजित पवारांनी म्हटले आहे.
- अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले आहे, शेतकऱ्यांना भरपाई द्यावी म्हणून विरोधक आक्रमक होण्याची शक्यता.
- आमदार नितीन देशमुख यांचे छत्रपती शिवाजीमहाराज पुतळ्याजवळ आमरण उपोषण सुरू, पाणी प्रश्नासाठी देशमुख आक्रमक
- विरोधक अन् सत्ताधारी आज पुन्हा आमनेसामने; किसान सभेची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक
- शीतल म्हात्रे प्रकरणाचे आजही सभागृहात पडसाद उमटण्याची शक्यता.
- शेतकरी आत्महत्येच्या मुद्द्यावरून विरोधक शेतकऱ्यांना घेरण्याची शक्यता.
- किसान सभेच्या मोर्चाचा तिसरा दिवस, आज तीन वाजता मुख्यमंत्र्यांसोबत बैठक
- शिवसेनेच्या शिंदे गटाच्या उपनेत्या शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांचा आक्षेपार्ह मार्फ केलेला व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणाच्या तपासासाठी ‘एसआयटी’ची स्थापना केल्याची घोषणा सोमवारी मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानसभेत केली. शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या सोशल मीडियाचा राज्य समन्वयक विनायक डावरे याने हा व्हिडिओ मातोश्री या फेसबुक पेजवर अपलोड केला असून, इतर आरोपींनी जाणीवपूर्व काही व्हॉटस्अॅप ग्रुपवर व्हायरल करून फेसबुक पेजवर शेअर केल्याचे समोर आल्याचे देसाई यांनी सांगितले. त्यामुळे ठाकरे गटाच्या अडचणीत भर पडली आहे