राज्याच्या सत्तासंघर्षावरील सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे. थोड्याच वेळात सुनावणीला सुरुवात होणार आहे. आज शिवसेनेकडून वकील हरीश साळवे युक्तिवाद करणार आहेत. तर राज्यपालांच्या वतीने सॉलिसेटर जनरल तुषार मेहता हे बाजू मांडतील. त्यामुळे आज सुप्रीम कोर्टामध्ये नेमके काय होते, हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.
- ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई सुप्रीम कोर्टात दाखल झाले आहेत.
आतापर्यंतचा ठाकरे गटाचा युक्तिवाद
अॅड. अभिषेक मनू सिंघवी म्हणाले की, राज्यपालांचे बहुमताचे आदेशच रद्द करा
- आमदारांच्या अपात्रतेचे प्रकरण प्रलंबित असताना बहुमत चाचणीचा राज्यपालांनी आदेश देणे हे चुकीचे. दहाव्या सूचीतील अधिकारांचा हा गैरवापर आहे.
- राज्यपालांनी उद्धव ठाकरेंना पत्र पाठवून ‘आता तुम्ही शिवसेना नाहीत तर बहुमत असलेले आमदार हेच पक्ष आहेत’ असे नमूद केले होते. हा अधिकार कुणी दिला?
- राज्यपालांचे बहुमत चाचणीचे पत्रच रद्द करा म्हणजे परिस्थिती जैसे थे होईल आणि घटनात्मक गुंता सुटेल.
-
- सरन्यायाधीश म्हणाले, ‘सत्ताधारी पक्षात फूट दिसत असताना राज्यपालांनी काहीच निर्णय घ्यायचा नाही का?’ त्यावर अॅड. सिंघवी म्हणाले,‘ पक्षांतर्गत बाबीत हस्तक्षेप करण्याचा अधिकार राज्यपालांना नाहीच.
- अॅड. देवदत्त कामत म्हणाले की, नवे सरकार आल्यानंतरच्या घडामोडींवर मी युक्तिवाद करणार आहे.
- गटनेते एकनाथ शिंदे यांनी भरत गोगावले यांच्या प्रतोदपदी नियुक्तीचे पत्र दिले. पण हा निर्णय पक्षाचा नव्हता. त्याला विधानसभा अध्यक्षांनी नियमबाह्य मंजुरी दिली. एखादा गटनेता मुख्य प्रतोद नेमू शकतो का? हा अधिकार पक्षाच्या प्रमुखालाच असतो.