आदर्श मैत्री फाउंडेशन च्या वतीने मातोश्री वृद्धाश्रमात आजी आजोबा सोबतोबत रंगपंचमी साजरी
लातूर- जिल्ह्यात सर्वत्र रंगपंचमी उत्साहात साजरी होत असतानाच आदर्श मैत्री फाऊंडेशनने नेहमीप्रमाणेआपले वेगळेपण जपत समाजातील एक दुर्लक्षित घटकज्यांना प्रेमाची आपुलकीची मायेची गरज आहेअसे मातोश्री वृद्धाश्रम लातूरयेथील आजी आजोबा यांच्या समवेत रंग खेळूनरंगोत्सव साजरा करतआजी आजोबांचाआनंद द्विगुणित करत रंगपंचमी साजरी केली. आदर्श मैत्री फाऊंडेशनचे संस्थापक संतोषजी बिराजदार यांच्याा संकल्पनेतून आदर्श मैत्री फाऊंडेशनच्या वतीने नेहमीच समाजातील दुर्लक्षितत घटकांना समाजाच्या प्रवाहात आणणे त्यांनाही सन्मानपूर्वक वागणूक देणे आवश्यकतेनुसार मदत करण्याचे काम फाउंडेशनच्या मार्फत सातत्याने करण्यात येत आहे. त्याप्रमाणेच आपल्या संस्कृतीमधील रंगपंचमी हा सण लातूर येथील मातोश्री वृद्धाश्रम येथील आजी आजोबाना रंग लावून त्यांच्यासोबत संवाद साधत गाण्याच्या तालावर अगदी मनसोक्त नृत्य करत साजरा केला याप्रसंगी त्यांच्या चेहऱ्यावरील समाधान आनंद पाहता खऱ्या अर्थाने रंगपंचमी साजरी केल्याचे समाधान लाभले. यावेळी आजी-आजोबानि या उत्सवामध्ये शंभर टक्के सहभागी होऊन आनंद लुटत् पोटात आदर्श मैत्रीच्या सर्व टीमला शुभेच्छा, आशीर्वाद दिला. यावेळी उपस्थित फाउंडेशनचे अध्यक्ष संतोष बिराजदार , समाजकल्यांनचे उपयुक्त अविनाश देवशटवार, जिल्हा क्रीडा अधिकारी लकडे साहेब, फाउंडेशनच्या संचालक प्राध्यापक शिवराज मोठेगावकर, तुकाराम पाटील, निलेश राजेमाने, राजेश मित्तल, शशिकिरण भिकाने ,इस्माईल शेख, सूर्यकांत कठारे, रमेश खाडप, प्रमोद भोरेकर, संभाजी नवघरे,आसिफ शेख, अशोक तोगरे, तेजस शेरखाने, प्रमोद टेकले, संपत जगदाळे, अमोल जानते, सुदाम पवार,पंकज जयस्वाल मातोश्री वृद्धाश्रमाचे सचिव खेडेकर सर, चव्हाण सर यांच्या सह अनेक जन उपस्तित होते.
आदर्श मैत्री फाउंडेशन च्या वतीने मातोश्री वृद्धाश्रमात आजी आजोबा सोबतोबत रंगपंचमी साजरी
