राष्ट्रीय बांबू मिशन द्वारा नवी दिल्ली येथे ‘बांबू क्षेत्राच्या विकासावर राष्ट्रीय कार्यशाळा’ चे आयोजन पाशा पटेल यांच्या उपस्थितीत कार्यशाळेचा समारोप
NAVI DELHI राष्ट्रीय बांबू मिशन ने 10 मार्च 2023 रोजी नवी दिल्ली येथे ‘बांबू क्षेत्राच्या विकासावर राष्ट्रीय कार्यशाळा’ आयोजित केली होती. कार्यशाळेचे उद्घाटन कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव डॉ. अभिलाक्ष लेखी यांच्या हस्ते झाले. राष्ट्रीय बांबू मिशन सक्षम करण्यासाठी प्रोत्साहनाद्वारे उत्पादकांना सक्षम करण्यासाठी आणि सरकारी योजनांचा लाभ शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मंत्रालयाच्या प्रयत्नांबद्दल त्यांनी सांगितले.
उद्घाटन सत्राला म्यानमारचे राजदूत श्री. मो क्याव आंग, सर्बियाचे राजदूत श्री सिनिसा पविक, नेपाळच्या आर्थिक व्यवहार मंत्री नीता पोखरेल आर्यल, केंद्रीय फलोत्पादन आयुक्त डॉ. प्रभात कुमार आणि केंद्रीय कृषी मंत्रालयाचे पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यशाळेत च्या उद्घाटन प्रसंगी बांबू टेक्निकल सपोर्ट ग्रुप साउथ झोन, केरळ फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट यांच्या द्वारा बांबू संबंधित माहितीसाठी विशेष वेबसाइट ची सुरुवात करण्यात आली. बांबूच्या प्रजाती, लागवड, कारागीर, संशोधक, शेतकरी, वृक्षारोपण आणि रोपवाटिका इत्यादींची सविस्तर माहिती या वेबसाइटवर उपलब्ध करण्यात आली आहे. यानंतर फाउंडेशन फॉर एमएसएमई क्लस्टर्सच्या ‘इको फ्रेंडली डिफरंट प्रोडक्ट्स अँड बिझनेस अपॉर्च्युनिटीज ऑफ बांबू’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. भारतीय बांबू क्षेत्राची व्याप्ती सांगणारी राष्ट्रीय बांबू मिशन ची लघुपटही यावेळी दाखवण्यात आला.
केंद्रीय फलोत्पादन आयुक्त डॉ.प्रभात कुमार यांनी कार्यशाळेच्या रुपरेषेची माहिती दिली. शाश्वत आणि पर्यावरणपूरक उत्पादनांच्या वापराबाबत वाढती जागरूकता, पायाभूत सुविधांच्या विकासात वाढणारी गुंतवणूक आणि शाश्वत बांधकाम साहित्याचा वापर हे बांबूच्या वाढीचे प्रमुख चालक आहेत यावर त्यांनी प्रकाश टाकला. चर्चेचा विस्तार करण्यासाठी, पाच तांत्रिक सत्रे देखील आयोजित करण्यात आली होती ज्यात बांबू उद्योगातील तज्ञांचे सादरीकरण आणि प्रतिनिधींसोबतचे सत्र समाविष्ट होते. यावेळी कृषी मंत्री (महाराष्ट्र) श्री अब्दुल सत्तार हे देखील उपस्थित होते आणि त्यांनी या क्षेत्राची क्षमता आणि व्याप्ती यावर आपले विचार मांडले. त्यांनी प्रदर्शनाला भेट देऊन कारागीर आणि उद्योजकांशी संवाद साधला.
बांबू क्षेत्रात काम करणारे मा. आमदार पाशा पटेल आणि डॉ. प्रभात कुमार, आयुक्त फलोत्पादन यांच्या भाषणाने कार्यशाळेचा समारोप करण्यात आला. आपल्या समारोपीय भाषणामध्ये शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये बांबू अमुलाग्र बदल करू शकतो असे नमूद केले. तसेच बांबू शेतीचा प्रचार व प्रसार करण्यासाठी मागील पाच वर्षापासून महाराष्ट्र व इतर राज्यामध्ये जन जागृती चे काम करीत आहोत. शेतकऱ्यांना उत्तम प्रतीची रोपे उपलब्ध करून देण्यासाठी लोदगा जि.लातूर येथे आंतरराष्ट्रीय दर्जाची टिशू कल्चर प्रयोगशाळेची निर्मिती केलेली आहे तसेच ग्रामीण महिलांना रोजगार निर्मिती करिता अत्याधुनिक दर्जाच्या बांबू पासून फर्निचर बनविण्याचा कारखाना सुरु केला असल्याचे श्री पटेल म्हणाले.