पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची बाभळगाव निवासस्थानी सदिच्छा भेट
लातूर प्रतिनिधी:- दि. १४ ऑगस्ट (गुरुवार):-
राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री
शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी गुरुवार, दि. १४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी
बाभळगाव येथील विलासबाग स्मृतीस्थळी जाऊन लोकनेते माजी मुख्यमंत्री
विलासराव देशमुख यांच्या १३ व्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन
केले.
यानंतर लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी बाभळगाव
निवासस्थानी भेट देऊन त्यांचा सत्कार स्वीकारला, तसेच त्यांच्याशी विविध
विषयांवर सविस्तर चर्चा केली.
यावेळी माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख, विलास सहकारी
साखर कारखान्याच्या चेअरमन वैशालीताई विलासराव देशमुख, माजी आमदार
धीरज विलासराव देशमुख, आमदार संजय बनसोडे, खासदार डॉ. शिवाजी काळगे,
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हासदादा पवार, विनायकराव पाटील, आबासाहेब पाटील,
लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अभय साळुंके, लातूर शहर जिल्हा काँग्रेस
कमिटीचे अध्यक्ष ॲड. किरण जाधव, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संतोष
देशमुख, ॲड. व्यंकट बेद्रे, प्रशांत पाटील, अविनाश देशमुख आदी उपस्थित होते.
