• Thu. Aug 14th, 2025

लोकनेते विलासराव देशमुख यांना १३ व्या स्मृतिदिनानिमित्त विलासबाग बाभळगाव येथे जनसमुदायाच्या उपस्थितीत आदरांजली अर्पण

Byjantaadmin

Aug 14, 2025

लोकनेते विलासराव देशमुख यांना १३ व्या स्मृतिदिनानिमित्त विलासबाग बाभळगाव येथे जनसमुदायाच्या उपस्थितीत आदरांजली अर्पण

लातूर प्रतिनिधी, १४ ऑगस्ट २५:
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री आणि लोकनेते विलासराव देशमुख यांचा
आज १४ ऑगस्ट २५ रोजी त्यांच्या १३ व्या स्मृतिदिनानिमित्त बाभळगाव येथील विलासबाग
येथे देशमुख कुटुंबीय, मराठवाड्यासह राज्यभरातून आलेल्या विविध संस्थांचे पदाधिकारी तसेच
मोठ्या जनसमुदायाच्या उपस्थितीत सार्वजनिक आदरांजली वाहण्यात आली. राजकारणात
दूरदृष्टी, अभ्यासू वृत्ती आणि अजातशत्रू व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जाणारे विलासराव
देशमुख साहेब हे एक असे नेते होते, ज्यांनी सरपंचपदापासून ते राज्याच्या सर्वोच्च
मुख्यमंत्रीपदापर्यंत तसेच केंद्रीयमंत्रीपदापर्यंत यशस्वी प्रवास केला. त्यांच्या दिलखुलास
स्वभावामुळे त्यांनी राजकीय विरोधकांनाही आपलेसे केले. त्यांच्या वक्तृत्वाची खास शैली आणि
शब्दांवरील पकड आजही अनेकांच्या स्मरणात आहे. त्यांच्या कार्याचे स्मरण करणे आणि
त्यांचे विचार पुढे घेऊन जाणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल. त्यांनी सहकार क्षेत्रात केलेले
कार्य अतुलनीय आहे. दुष्काळी मराठवाड्यात त्यांनी सहकार चळवळ यशस्वी करून दाखवली,
ज्यामुळे मांजरा परिवारातील सहकारी साखर कारखाने आणि लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी
बँक यांसारख्या संस्था उभ्या राहिल्या. त्यांच्या नेतृत्वामुळे लातूरला जिल्ह्याचा दर्जा मिळाला
आणि विकासाला गती मिळाली. राजकारणाच्या नभात विलासराव देशमुख नावाचे वलय
आपल्याला कायम प्रेरणा देत राहणार आहे. गुरुवार, १४ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता
विलासबाग, बाभळगाव येथे संतवाणी हा कार्यक्रम सादर करण्यात आला. लातूरसह राज्यभरात
यानिमित्ताने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आदरणीय
विलासराव देशमुख आणि देशमुख परिवारावर प्रेम करणारे स्नेही, मित्र, हितचिंतक मोठ्या
संख्येने उपस्थित होते. या सर्वांनी स्मृतीस्थळी पुष्पांजली अर्पण करून आपल्या आवडत्या
नेत्याला भावपूर्ण आदरांजली वाहिली.
लोकनेते विलासराव देशमुख यांना विलासबाग, बाभळगाव येथे प्रारंभी माजी मंत्री सहकार
महर्षी दिलीपरावजी देशमुख, राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री आमदार
अमित विलासराव देशमुख, लातूर ग्रामीणचे माजी आमदार धीरज विलासराव देशमुख, विलास
साखर कारखाना चेअरमन वैशालीताई देशमुख, विनायकराव पाटील, अभिजीत देशमुख, डॉ.
सारिका देशमुख यांनी पुष्पांजली अर्पण केली.
लोकनेते विलासराव देशमुख यांना आदरांजली अर्पन करण्यासाठी राज्याचे सार्वजनिक
बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले,  परिवहन मंत्री प्रताप
सरनाईक, माजी क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, खासदार शिवाजी काळगे, माजी
आमदार विलास कारखान्याचे व्हा.चेअरमन वैजनाथराव शिंदे, माजी आमदार त्र्यंबकराव भिसे,
विचारवंत उल्हासदादा पवार, पोलीस महानीरीक्षक नांदेड विभाग शहाजी उमाप, जिल्हाधिकारी
वर्षा ठाकूर – घुगे, मुख्य कार्यकारी अधिकारी राहूलकुमार मीना, पोलीस अधीक्षक अमोल तांबे,
उपविभागीय अधिकारी रोहिणी नरे, तहसीलदार सौदागर तांदळे, आयुक्त मानसी मीना,
अशोकराव पाटील निलंगेकर, श्रीशैल उटगे, जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष अभय सांळुके, लातूर
शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष ॲड. किरण जाधव, तहसीलदार-सौदागर तांदळे, प्रादेशिक परिवहन
अधिकारी-विजय भोये, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी-अस्लम तडवी, मुख्य अभियंता
जलसंपदा-श्रीमती रुपाली ठोंबरे, ता.कृषी अधिकारी-प्रमोद राठोड, जिल्हा नियोजन अधिकारी-
श्री.रेड्डी, उप विभागीय अधिकारी-श्री.नेटके, लक्ष्मीरमण लाहोटी, डॉ. उदय मोहिते, धनंजय
तात्या देशमुख, ॲड. वेंकट बेद्रे यांनी आदरांजली अर्पण केली.
या आदरांजली कार्यक्रमात माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे, सभापती जगदीश बावणे,
अशोक गोविंदपूरकर, लक्ष्मण मोरे, ॲड. समद पटेल, यशवंतराव पाटील, आबासाहेब पाटील,
प्रवीण पाटील, अनंत देशमुख, संतोष देशमुख, अविनाश देशमुख, ललित भाई शहा, विजय
देशमुख, कैलास पाटील, अनिल पाटील, गणपतराव बाजुळगे, गोविंद देशमुख, ॲड. फारुख
शेख, डॉ. दिनेश नवगिरे, संभाजी सुळ, दगदुसाहेब पडिले, सुनील पडिले, युवराज जाधव, सुपर्ण
जगताप, संतोष सोमवंशी, गिरीश पाटील, गोविंद डुरे पाटील, कल्याण पाटील, शिवाजी
कांबळे, विजय टाकेकर, बसवंतअप्पा भरडे, सचिन पाटील, संजय निलेगावकर, दत्ता सोमवंशी,
लक्ष्मण कांबळे, अंगद वाघमारे, जफर नाना, कुमार अप्पा पारशेट्टी, प्रताप पाटील, प्रकाश
घादगिने, लालासाहेब देशमुख, चंद्रशेखर दंडामे, दिलीप पाटील नागराळकर, तात्यासाहेब
पालकर, सुभाष घोडके, तबरेज तांबोळी, कैलास कांबळे, युनूस मोमीन, विकास वाघमारे, अनुप
मालवाड, अजित लोंढे, डॉ. अर्चनाताई देशमुख, स्वयंप्रभा पाटील, विद्याताई पाटील, प्रा. स्मिता
खानापूरे, सपना किसवे, शिलाताई पाटील, कमलबाई मिटकरी, प्रिती भोसले, खाजबानू बुऱ्हाण,
सुनीता आरळीकर, संगीता मोळवने, सुलेखा कारेपूरकर, लता काटे, उषा राठोड, आशा चव्हाण,
ज्योती पवार, लता मुमाणे, अमर खानापूरे, डॉ. बी.आर.पाटील, रामकिशन मदने, रणजित
पाटील, ॲड. राजेंद्र काळे, सूर्यकांत कातळे, गोटू यादव, विठ्ठल पावडे, पृथ्वीराज शिरसाठ,
अविनाश बत्तेवार, मुकेश बिदादा, ॲड. प्रदीप सिंह गंगणे, मनोज देशमुख, शरद देशमुख, संदीप
बिराजदार, अय्युब पठाण, महेबब पटेल, शब्बीर पठाण, सतीश साळुंके, ॲड. विजय गायकवाड,
प्रा. प्रवीण कांबळे, राम स्वामी, बादल शेख, अनंत बारबोले, संजय जगताप, मारोती पांडे,
आनंदभाई वैरागे, संभाजी रेड्डी, सुंदर पाटील कव्हेकर, असिफ बागवान, सुरेश गायकवाड,
राहुल डुमने, चांदपाशा इनामदार, पंडित कावळे, प्रवीण सुर्यवंशी, हरीराम कुलकर्णी, डॉ. अरविंद
भातांबरे, ॲड. विकास सुळ, सुरज राजे, दगडूअप्पा मिटकरी, आनंद मालू, पप्पू देशमुख,
अविरराजे निंबाळकर, गिरीश ब्याळे, रमेश थोरमोटे, शिवाजी सूर्यवंशी, नितीन कांबळे, अजित
माने, रमेश सिंह बिसेन, राज क्षीरसागर, इम्रान सय्यद, मोहन सुरवसे, ॲड. बाबा पठाण,
प्रवीण घोटाळे, पोलीस निरीक्षक-संतोष पाटील, पवन सुरवसे, पवनकुमार गायकवाड, व्यंकट
शिंदे, डॉ. देशमुख, राजा माने, नागसेन कामेगावकर, राजेसाहेब सवाई, चंद्रकांत मुद्दे, रामदास
पवार, सिकंदर पटेल, संतोष नागरगोजे, गोरोबा लोखंडे, धीरज पाटील, विनोद वीर, वेदांत
मालू, चैतन्य मालू, पद्माकर उगीले, गोविंद बोराडे, डॉ. माधव गादेकर, ॲड. सुमित खंडागळे,
राजू गवळी, प्रा. संमुखराव, सचिन कांबळे, महेश नागलगावे, प्राचार्य साखरे, जितेंद्र सपाटे,
अभिजित अंकलकोटे, बालाजी जाधव, आबासाहेब देशमुख, विष्णू देशमुख, सुबुद्दीन शेख,
चंद्रकांत धायगुडे, तुकाराम पाटील, जनार्धन वंगवाड, राजकुमार जाधव, ज्ञानेश्वर भिसे, श्रीकांत
गर्जे, इसरार सगरे, धोंडीराम यादव, ओमप्रकाश पाटील, संकेत उटगे, निपुण शेंडगे, पत्रकार-
धर्मराज हल्लाळे, दिपरत्न निलंगेकर, वामन पाठक, प्रा. भालचंद्र येडवे, जयप्रकाश दगडे,
चंद्रकांत झेंरीगुंठे, ओम मोतीपवळे, राम जेवरे, बशीर शेख, फिरोज पठाण, एजाज शेख, अजय
बोराडे पाटील, प्रा. भारत सातपुते, मधुकर गुंजकर, ॲड. महेश काळे, रविशंकर जाधव, ॲड.
गोपाळ बुरबुरे, मारुती चव्हाण, दिलीप माने, नरसिंग बुलबुले, सचिन बंडापल्ले, सचिन दाताळ,
शिवाजी देशमुख, रसूल पटेल, राम साळुंखे, प्रा. बालाजी वाकुरे, यशपाल कांबळे, अब्दुल्ला
शेख, करीम तांबोळी, सतीश हलवाई, रमेश शिंदे, सचिन मस्के, सुरेश लहाने, दिलीप गुरमे,
माणिक शिरसाठ, चंद्रकांत चव्हाण, सर्जेराव मोरे, शाम भोसले, प्रमोद जाधव, प्रशांत पाटील,
ए.आर.पवार, एस.डी. बोखारे, आर.बी. माने, बी.व्ही. मोतीपवळे, राजेश्वर देशमुख, अनुप
शेळके, भागवत जोशी, राजकुमार पाटील, रमेश देशमुख, बालाप्रसाद बिदादा, अनिल चव्हाण,
निलेश देशमुख, संजय माने, गुरुनाथ गवळी, लालासाहेब देशमुख महाराज, आबासाहेब पाटील
उजेडकर, तानाजी फुटाणे, बालाजी साळुंके, मदन भिसे, पंडित ढमाले, लक्ष्मण पाटील, लिंबराज
पवार, एन.आर. पाटील, चंद्रकांत देवकते, नारायण पाटील, सुभाष माने, हकीम शेख, संजय
पाटील खंडापूरकर, ज्ञानोबा पडीले, अमृत जाधव, श्रीनिवास शेळके, मनोज पाटील, अभिजीत
इगे, ॲड. देविदास बोरुळे पाटील, सतीश पाटील, प्रा. गोविंद घार, सत्तारभाई शेख, प्राचार्य
अजय पाटील, वर्षा मस्के, केशरबाई महापुरे, लता मुमाणे, दिलीप पाटील नागराळकर, सौ.
अनिता केंद्रे, अरुण समुद्रे, शहाजी पवार, जफर पटेल, जहीरोददीन मणियार, अग्नीवेश शिंदे,
प्रमोद चौधरी, संजय पाटील, संजय जेवरेकर, नारायण लोखंडे, भैरवनाथ सवासे, संजय पाटील
खंडापूरकर, दयानंद बिडवे, मनोज चिखले, जितेद्र स्वामी, अथरोदीन काझी, आदीनी आदरांजली
वाहीली.आदरणीय विलासराव देशमुख यांच्या स्मृतिदीनानिमीत्त आदरांजली अर्पण करण्यासाठी
उपस्थित असलेल्या विविध्‍ क्षेत्रातील मान्यवर, संस्थाचे पदाधिकारी, काँग्रेस पक्ष व सलग्न
संघटनाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतक यांच्या मनात विलासराव देशमुख यांच्या भावपूर्ण
आठवणी यावेळी दाटून आल्या.या प्रसंगी सुप्रसिद्ध पंडित रघुनंदन पणशीकर यांच्या शास्त्रीय गायनाचा संतवाणी
कार्यक्रम सादर करण्यात आला. त्यांनी आपल्या गायकीने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. याकार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळकृष्ण धायगुडे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *