• Thu. Aug 14th, 2025

लोकनेते विलासराव देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्त बाभळगाव विलासबागेतसंघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांच्याकडून स्मृतीस विनम्र अभिवादन

Byjantaadmin

Aug 14, 2025

लोकनेते विलासराव देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्त बाभळगाव विलासबागेत
संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांच्याकडून स्मृतीस विनम्र अभिवादन

लातूर प्रतिनिधी:-दि.१४ ऑगस्ट २०२५(गुरुवार)
मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांनी गुरुवार दि. १४ ऑगस्ट
२०२५ रोजी सायंकाळी लोकनेते विलासराव देशमुख यांच्या १३ व्या स्मृतिदिनानिमित्त
बाभळगाव येथील विलासबाग येथे जाऊन त्यांच्या स्मृतींना पुष्पांजली अर्पण करीत विनम्र
अभिवादन केले.
त्यानंतर मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांचा बाभळगाव
निवासस्थानी माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख व लातूर जिल्हा मध्यवर्ती
सहकारी बँकेचे अध्यक्ष माजी आमदार धीरज विलासराव देशमुख यांनी सत्कार करून “असा
घडला भारत” ग्रंथ भेट दिला. आणि त्यांच्याशी मराठा आरक्षण संदर्भात सविस्तर चर्चा केली.
यावेळी उमरगा-लोहारा विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रवीण स्वामी, माजी आमदार
वैजनाथ शिंदे,  लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अभय साळुंके, लातूर शहर जिल्हा
काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण जाधव, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे लातूर
जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी, नामदेव चाळक, हंसराज जाधव, डी.एस पाटील कामखेडकर,
बाभळगावचे उपसरपंच गोविंद देशमुख आशिष काटे, नानासाहेब जाधव, अविनाश देशमुख
आदी उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *