निलंगा येथे हर घर तिरंगा रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद
निलंग – स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर निलंगा शहरात हर घर तिरंगा रॅलीचे भव्य आयोजन करण्यात आले. देशाचे प्रतीक असलेल्या राष्ट्रध्वजाचा गौरव साजरा करण्यासाठी,सीमेवरील जवानांचे मनोबल वाढवण्यासाठी, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी व नागरिकांच्या मनात राष्ट्रप्रेम वाढविण्यासाठी ही रॅली काढण्यात आली.
रॅलीमध्ये शहरातील विविध शाळांनी उत्साहाने सहभाग नोंदविला. तालुक्यातून आलेल्या विद्यार्थी, व्यापारी वर्ग, डॉक्टर, शिक्षक, अधिकारी व विविध सामाजिक घटकांनी देशाचा अभिमान ‘हर घर तिरंगा’ , भारत माता की जय,वंदे मातरम् या घोषणेतून राष्ट्र प्रेमाची भावना व्यक्त केली. रॅलीदरम्यान देशभक्तीपर घोषणा, तिरंग्याचे फडकते झेंडे आणि देशप्रेमाचा जोश शहरभर अनुभवायला मिळाला.
या भव्य रॅलीला माजी खासदार श्रीमती रूपाताई पाटील निलंगेकर,माजी मंत्री लोकप्रिय आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर, युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यांनी शुभेच्छा दिल्या. रॅली मध्ये भाजपा जिल्हा सरचिटणीस संजय दोरवे, जिल्हा उपाध्यक्ष शेषराव ममाळे,तालुकाध्यक्ष कुमोद लोभे, निलंगा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतीचे शिवकुमार चिंचनसुरे,औराद कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नरसिंग बिरादार,औराद मंडळ अध्यक्ष अनिल भंडारे, महिला आघाडीच्या संध्याताई पाटील,मोरे ताई,माजी जि.प. सदस्य डॉ.संतोष वाघमारे, डॉ मल्लिकार्जुन शंकद, माजी नगराध्यक्ष ॲड.विरभद्र स्वामी, माजी उपनगराध्यक्ष मनोज कोळ्ळे,अविराज पाटील,अरविंद पाटील,विनायक गोमसाळे,सुमीत इनानी,दयानंद कांबळे,नयन माने,नसीम खतीब,अमीर पटेल,नागेश तरंगे, उत्तम लासुणे उपस्थित होते.रॅलीदरम्यान देशभक्ती पर गीतांनी वातावरण दुमदुमून शहरात उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले. पदयात्रेचे हुतात्मा स्मारक येथे राष्ट्रगीताने सांगता करण्यात आली.
